दूध संकलन वाढीसाठी उत्पादक, दूध संस्था व गोकुळ यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे – अरुण डोंगळे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विनायक जितकर

गोकुळ संघाशी सलग्न कागल तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा खेळीमेळीत…

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

कोल्हापूर – कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या, कोल्हापूर (गोकुळ) संघाशी सलग्न कागल तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा आज मंगळवार २२ रोजी आर. के. मंगल कार्यालय, बामणी, ता. कागल येथे संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्‍या अध्यक्षतेखाली व संचालक मंडळाच्या उपस्थित पार पडली. यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले संघाने राबविलेल्‍या सर्व योजनांचा दूध संस्‍था व दूध उत्‍पादकांनी जास्‍तीत-जास्‍त लाभ घ्‍यावा. संघ सद्या सरासरी १५ लाख लिटर्स इतके दूध संकलन करीत असून संघाने २० लाख लिटर्स दूध संकलनाचे उध्दिष्‍ट पूर्ण करण्‍याचा संकल्प केला असून तो पुर्ण करणेसाठी दूध उत्पादक, दूध संस्था व गोकुळ यांनी सामुदायिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच कागल तालुक्यातील दुधाची गुणवत्ता हि चांगली असून ती टिकवून ठेवणेसाठी दूध उत्पादकांनी वैरण बँकेच्या माध्यमातून जनावरांना उपयुक्त अशी वैरण तयार केली पाहिजे. भविष्यात शासनामार्फत वैरण बी-बियाणे सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.

संपर्क सभेवेळी कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संस्‍था कर्मचारी संघटनेचे सचिव विश्‍वास पाटील म्‍हणाले की दूध संकलन केंद्रावर खरेदी-विक्री करता दहा ग्रॅम अचूकतेची इलेक्ट्रॉनिक वजन काटे वापरण्यासंबंधीचा निर्णयामुळे प्रत्यक्षातील कामकाज जिकिरीचे होणार आहे. शिवाय सगळी प्रक्रिया वेळखाऊ तसेच शेतकऱ्यांचे नुकसान करणारी आहे व या निर्णयामुळे जिल्‍हातील सर्व दूध संस्‍थाचे वजन काटे बदलावे लागणार असुन यामुळे नविन वजन काटे खरेदीमुळे दूध संस्‍थानावरती आर्थिक बोज्‍या पडणार आहे यासर्व गोष्‍टीचा विचार करूण शासनामार्फत मदत मिळावी, किवा इलेक्ट्रॉनिक वजन काट्यामधील त्रुटी दूर कराव्यात यासंदर्भात संघटना व गोकुळ दूध संघाने शासनाकडे पाठपुरावा केला त्‍यानुसार मा.मंत्री महोदयानी यासंदर्भात बैठक घेऊन योग्‍य तो निर्यण घेण्‍याचे आश्‍वासन दिले होते. तसेच गोकुळ दुध संघाने दहा ग्रॅम अचूकतेची इलेक्ट्रॉनिक वजन काटे न वापरण्यासंबंधीचा कोणताही आदेश संघाशी सलग्न प्राथमिक दूध संस्थाना दिलेला नाही. असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी संघाच्या दूध वाढ कृती कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विस्तार सुपरवाझर यांचा सत्कार करण्यात आले. गोकुळ मार्फत न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी तर्फे उतरवण्यात आलेल्या किसान विमा पॉलिसी अंतर्गत अपघाती मृत पावलेल्या सभासदांच्या वारसांना व मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले व संकलन, पशुसंवर्धन, वैरण विकास, पशुखाद्य, वित्‍त, मिल्‍कोटेस्‍टर, संगणक, गुणनियंञण व दुध बिल या विभागावर सविस्‍तर चर्चा होवून अडचणी समजावून घेवून त्‍या प्रश्‍नांचे निरसण करण्‍यात आले तसेच विविध सूचनाची नोंद घेण्यात आली.

याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, संघाचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक विश्वासराव पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, चेतन नरके, राजेंद्र मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले व संघाचे अधिकारी तसेच कागल तालुक्यातील दूध संस्थाचे चेअरमन, संचालक, प्रतिनिधी तसेंच कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संस्‍था कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.