पत्रकाराला मारहाण करणाऱ्यावर आणि ५०गाईच्या मृत्यूस कारणीभूत कणेरी मठ व तथाकथित गुंड स्वयंसेवकावर कठोर कारवाई करावी!
एनयुजेमहाराष्ट्र व मिडिया असोसिएशन ऑफ इंडिया च्या वतीने तीव्र निषेध व कठोर कारवाईची मागणी
कोल्हापूर / प्रतिनिधी
कणेरी मठ येथे सुरू असलेल्या पंचमहाभूत महामंगल सोहळ्या दरम्यान ५० हून अधिक गायींचा मृत्यू झाला आहे. याठिकाणी संबंधित घटनेच्या माहितीचे वार्तांकन करण्यासाठी पोहचलेल्या इलेक्ट्रानिक माध्यमांच्या प्रतिनिधींना मठाच्या स्वयंसेवकांकडून मारहाणीचा संतापजनक प्रकार घडला आहे. हा प्रकार निश्चितच निंदनीय तसेच निषेधार्हचा आहे.
टीव्ही 9 वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी भूषण पाटील याठिकाणी संबंधित घटनेच्या वार्तांकनासाठी पोहचले होते, यावेळी हा प्रकार घडला आहे. गाईंच्या मृत्यूची माहिती मिडीयापासून लपवण्यासाठी कणेरी मठाच्या वतीने दबावतंत्रांचा वापर सुरू असल्याचे या प्रकारावरून दिसून येत आहे. पत्रकारांचे कामच अचूक व सत्य घटना जनतेसमाेर आणण्याचे असते. नेमकं हेच वृत्तांकनचे काम करत असतानाच, टी व्ही 09 च्या पत्रकारांवर हल्ला हाेताे. हे धाडस यांच्यात आलेच काेठून ? याचबराेबर इतका काेट्यवधी रुपयांचा निधी येऊन. शेकडाे स्वयंकसेवक कार्यरत असताना, अन्नधान्याची व्यवस्था असताना, औषधाेपचारांचा पुरवठा असताना तसेच सर्वताेपरी शासकीय यंत्रणा देखिल २४ तास कार्यरत असतानाच ५४ पेक्षा अधिक गायींचा मृत्यू झालाच कसा. याचा नेमकं काेण जबाबदार आहे. हे समाजासमाेर येणे गरजेचे आहे. काेट्यवधी रुयांचा दिलेला निधीत, समाजातील प्रत्येक व्यक्तीचे याेगदान आहे. हा जनतेचा पैसा आहे. मग इतका पैसा देऊनही. नियाेजनात अशी कमतरता कशी काय राहू शकते. त्यामुळे या झाल्या प्रकाराची चाैकशी हाेऊन, पत्रकारांवर जाे हल्ला झाला. ज्यांनी केला त्यांच्यावरही कारवाई हाेणे गरजेचे आहे. अशी मागणी सर्व पत्रकारांमधून पुढे येत आहे.
सरकारने पत्रकाराना मारहाण करणाऱ्यावर आणि ५०गाईच्या मृत्यूस कारणीभूत कणेरी मठ व तथाकथित गुंड स्वयंसेवकावर कठोर कारवाई करावी. तसेच झाल्या प्रकाराची नेमकी खरी माहिती, खुलासा सर्वसामान्य जनतेसमाेर करावा, अशी मागणी पुढे येत आहे.
एनयुजेमहाराष्ट्र व मिडिया असोसिएशन ऑफ इंडिया
शीतल करदेकर, डॉ सुभाष सामंत,वैशाली आहेर,डॉ अब्दुल कादीर,सचिन चिटणीस,शेखर धोंगडे, लक्ष्मीकांत घोणसे पाटील,विश्वनाथ येल्लूरकर,सुनिल कटेकर,वैजंता गोगावले,प्रविण वाघमारे,संदिप टक्के, संतोष खामगावकर,लक्ष्मण खटके,विष्णू कदम,भरत मानकर,शिवाजी नलावडे