बघत रहा, सोनी सबवरील ‘वंशज’, दर सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता
मालिकेतील कलाकरांसह प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता जय भानुशाली, टीना दत्ता, आकांक्षा पुरी देखील या दिमाखदार सोहळ्यात सामील होणार ~
एक बहु प्रतीक्षित सोहळा अगदी जवळ येऊन ठेपला आहे, आणि तो म्हणजे महाजन समूहाचा ७५ वा वर्धापन दिन! सोनी सबवर अलीकडेच लॉन्च झालेल्या वंशज मालिकेत महाजन साम्राज्यात होणाऱ्या या सोहळ्यात बड्या हस्ती उपस्थित असणार आहेत. यातच प्रसिद्ध टेलिव्हिजन कलाकार जय भानुशाली, टीना दत्ता आणि आकांक्षा पुरी यांचा देखील समावेश आहे. महाजन ग्रुप या एका मोठ्या व्यवसाय साम्राज्याचा वारसा आणि महाजनांच्या कुटुंबातील हेवेदावे दर्शविणाऱ्या या मालिकेने लोकांचे मन जिंकले आहे आणि त्यांना या मालिकेच्या विषयाबाबत विचार करायला भाग पाडले आहे.
महाजन समूहाच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याची तयारी जोरात सुरू असताना युविका (अंजली तत्रारी) या समूहाच्या संथापकांना आदरांजली वाहण्यासाठी एक ऑडिओ-व्हिज्युअल प्रेझेंटेशन तयार करत आहे, त्यात तिच्यासमोर एक संकट येऊन उभे ठाकले आहे. तिचा चुलता डीजे (माहिर पांधी) आपल्या कपटी स्वभावाला अनुसरून तिच्याविरुद्ध एक कट रचत आहे, याची तिला कल्पनाच नाहीये.
युविकाची भूमिका साकारत असलेली अंजली तत्रारी म्हणते, “मालिकेतील आगामी कलाटण्या पाहून प्रेक्षकांना नक्कीच धक्का बसेल आणि युविकाची काळजी देखील वाटेल. महाजन समूहाची एक पात्र वारस म्हणून स्वतःला सिद्ध करण्याच्या तिच्या प्रयत्नांच्या मार्गात एक मोठे कारस्थान येणार आहे. युविकाची भूमिका साकारताना तिच्या मनातील विविध भावना व्यक्त करताना एक कलाकार म्हणून मला स्वतःच्या कक्षा विस्तृत करण्याची संधी मिळाली आहे. या सगळ्या ताण-तणावात प्रेक्षक महाजन समूहाच्या 75 व्या वर्धापन दिनाचा सोहळा देखील पाहतील, ज्यात अनेक बडे कलाकार एका छताखाली हजर असतील.”
युविकाला हे लक्षात येते की, आपले प्रेझेंटेशन हटवून त्या जागी कुणी तरी दुसरेच प्रेझेंटेशन ठेवले आहे. मंचावर जाऊन ती जेव्हा आत्मविश्वासाने आपले प्रेझेंटेशन सुरू करते, तेव्हा एक अनपेक्षित संकट उलगडत जाते, ज्यामुळे युविका उद्ध्वस्त होते. मालिका एका अज्ञात प्रांताकडे वाटचाल करत आहे. येथे काही व्यक्तिरेखा आपले खरे रंग दाखवतील.