शेतकरी प्रशिक्षण…अर्जुनवाडा येथे कृषी विभागाचा उपक्रम

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

विनायक जितकर

पंजाबराव देशमुख नैसर्गिक सेंद्रीय शेती योजनेविषयी शेतकऱ्यांना माहिती…

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

बिद्री – महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी विज्ञान केंद्र तळसंदे व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानाने राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा येथेखरिप हंगाम पूर्व शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आत्मा प्रकल्प संचालिका रक्षा शिदें बोलताना म्हणाल्या पंजाबराव देशमुख नैसर्गिक सेंद्रीय शेती योजनेविषयी सविस्तर माहिती दिली व जिल्हात मोठ्या हि योजना राबणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे प्रमुख जयवंत जगताप यांनी भात बीज प्रक्रिया, बियाणे उगवण क्षमता, माती परिक्षण, चारसूत्रीभात लागण खतमात्रा नियोजन किटक नाशक वापरणाबाबत शेतकर्याना योग्य मार्गदर्शन केले. डॉ. सुधीर सूर्यगंध दुध उत्पादन वाढीसाठी चारा व्यवस्थापन पावसाळ्यात येणारे जनावराना आजार व त्यांचे योग्य निदान याबाबत योग्य मार्गदर्शन केले.

प्रगतशील शेतकरी उत्तम रंगराव पाटील पिरळ व युवराज विठ्ठल कुंभार कुंभारवाडी यांचा तालुका भात पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी कोल्हापूर आत्माप्रकल्प संचालीका रक्षा शिंदें राज्यस्तरिय आत्मा सदस्य अशोक फराकटे तालुका आत्मा सदस्य अरविंद पाटील सरपंच सुप्रीया यादव आत्मा तंत्रसहयक सुनिल कांबळे मंडळ कृषी अधिकारी कृषी सहय्यक ग्रामपंचायत सदस्य, यांचेसह शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.