तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
शिक्षण विभागाच्या उन्हाळी सुट्ट्यांच्या परिपत्रकाला ICSE बोर्डाच्या शाळांनी पुन्हा केराची टोपली दाखवली. मुंबई शिक्षणाधिकारी संदिप संगवे डोळे झाकून दूध पीत आहेत!!
(शीतल करदेकर)
(मुंबई)- महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने उन्हाळी सुट्ट्यांचे परिपत्रक जारी केले. त्यानुसार राज्यातील सर्व शाळा ह्या १४ जून रोजी उघडणार आहेत. पण मुंबईत मंत्रालयाच्या हाकेवर असणाऱ्या ICSE बोर्डाच्या शाळांनी ह्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.मुंबईतील ICSE बोर्डाच्या शाळा आपल्या मनमानी पद्धतीने कारभार करतात. हे जगजाहीर झाले आहे.
या शाळा १ मे पासून बंद आहेत पण १ किंवा ५ जूनच्या दरम्यान उघडणार आहेत. कोणाच्या आदेशाने या शाळांनी विद्यार्थी व शिक्षकांच्या सुट्ट्या कमी केल्या आहेत? मुंबई शिक्षण अधिकारी संदीप सांगवे नेहमीप्रमाणे डोळे बंद करून दूधमलई खातपीत आहेत. ते कोणतीही कारवाई करीत नाही.केवळ परिपत्रक काढतात, त्याच्यया अंमलबावणीबाबत सोईने शून्य असतात.
शिक्षणमंत्री. दीपक केसरकर हे मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी सुट्ट्यांच्या परिपत्रकाला केराची टोपली दाखवणाऱ्या शाळांवर आणि दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करावी व सर्व ICSE बोर्डाच्या शाळा ह्या १४ जून रोजीच उघडाव्यात अशी पालकांची मागणी आहे.शिक्षक प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेत प्रतिनिधीत्व करणारे शिक्षकांचे किती सक्षम प्रतिनिधित्व करतात हा प्रश्न या निमित्ताने प्रकर्षाने समोर येतोय! मुलांच्या व शिक्षकांच्या सुट्ट्या कमी करण्यात कोणते मानसिक समाधान या शाळा संचालकांना मिळते ? यात कोणते व कसले हितसंबंध आहेत हा संशोधनाचा विषय आहेच त्याचबरोबर महाराष्ट्रात शाळा चालवून महाराष्ट्र सरकारचे आदेश व नियमावली न पाळण्याचा बेदरकारपणा दिसून येतो तो का हा प्रश्न ही उभा राहातो.
महाराष्ट्र खाजगी संस्था शाळा अधिनियम महाराष्ट्रातील सर्व बोर्डाच्या शाळांच्या कर्मचाऱ्यांना लागू आहे. पण हे न जुमानणा-या शाळा
शाळा सुट्टी व शाळा सुरु करण्याच्या तारखा
कपोल स्कूल- १जुन शिक्षकांसाठी ३ जून विद्यार्थ्यांसाठी *एस एफ एस स्कूल – ५ जून शिक्षक व विद्यार्थी यांचेसाठी *बॉम्बे स्कॉटिश माहीम शाळा शिक्षकांना- ४ जून ला विद्यार्थी- ११ जून ला *आर्या विद्या मंदिर जुहू -६ जून *ठाकूर इंटरनॅशनल स्कूल कांदिवली पश्चिम -शिक्षक २५ जून , विद्यार्थी ३ जुलै *कपोल स्कूल मालाड पश्चिम शिक्षक ३ जून विद्यार्थी ५ जून *जानकीदेवी पब्लिक स्कूल अंधेरी पश्चिम १ जून *सेंट पीटर्स माझगाव ३१ मे जमनाबाई नरसी जुहू. *२४ मे पासून सुट्टी आणि ८ जुलै पासून शाळा सुरु *मनिकजी कूपर जुहू- ३ जून *सिंघानिया स्कूल ठाणे -५ जून *चतुरभुज नरसी स्कूल विलेपार्ले पश्चिम- ६ जून
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.