POXO ACT: जामीन मंजूर..न्याय मिळतो!

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

पोक्सो अंतर्गत तसेच बालविवाह गुन्ह्यात मुख्य संशयित आरोपींस जामीन मंजूर

कोल्हापूर : – दि २३ मे रोजी एक अल्पवयीन मुलीस सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल केले होते. या मुलीच्या उपचारा दरम्यान सदरची मुलगी ३ महिन्याची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्याने डॉक्टरांनी पोलिसांना सदरची माहिती दिली. त्यानंतर मुलीचा सविस्तर जबाब नोंदवण्यात आला होता.

गुन्हा घडला !तिघा आरोपींना अटकपूर्व जामीन

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

या जबाबाच्या आधारे अल्पवयीन मुलीशी विवाह करणाऱ्या आणि संबंध ठेवनाऱ्या तिच्या पती विरोधात आणि नातेवाईकांविरोधात राजारामपुरी पोलिस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता ६४(१) , पोक्सो कायदा कलम ४,६ आणि बालविवाह कायदा कलम ९,१० प्रमाणे एकूण चार आरोपी विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

COURT:CRIME NEWS:5 वर्षांनी जामीन; कोल्हापूर,बहुचर्चित मोक्कामधील आरोपी सुटले

गुन्ह्यातील मुख्य संशियत आरोपींला राजारामपुरी पोलिसांनी १ जून २०२५ रोजी अटक केली होती. सदर आरोपीने ॲड भारत सोनुले यांचेमार्फत मे.विशेष न्यायालय कोल्हापूर यांचेकडे जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता.सदर जामिन अर्जाची सुनावणी दि २० जून रोजी मे. विशेष न्यायाधीश सो कोल्हापूर यांचे कोर्टात पार पडली. यावेळी सरकारी पक्षातर्फे सदरचा जामीन अर्ज रद्द करण्यात यावा. यासाठी जोरदार युक्तीवाद करण्यात आला होता.परंतु आरोपीचे वकील ऍड भारत सोनुले यांनी केलेला युक्तीवाद आणि उच्च न्यायालयातील दिलेले न्यायनिर्णयाचे दाखले ग्राह्य मानून मे.कोर्टाने मुख्य संशयित आरोपींचा जामीन अर्ज अटी व शर्थिं सह मंजूर केला आहे.

तीन संशयित आरोपीना असाही जामीन मंजूर

यापूर्वी याच प्रकरणातील इतर ३ आरोपीना ॲड भारत सोनुले यांनी अटकपूर्व जामीन मिळवून दिला होता. आजरोजी मुख्य संशयितास देखील जामीन मंजूर झाला आहे. सदर कामी आरोपींचे वतीने ॲड भारत सोनुले,ॲड सतीश कुंभार ,ॲड प्रिती देवर्डेकर , ॲड सरोज देसाई यांनी काम पाहिले.

COURT- इथं न्याय मिळताेच…. राष्ट्रीय लाेकअदालत सर्वसामान्यांसाठी संधी!

या प्रकरणामध्ये मुख्य संशयित आरोपी हा बेंगलोर कर्नाटक राज्यातील होता , आरोपी विरोधात अजून चार्जशीट दाखल नव्हती , गुन्ह्याचा तपास अद्याप सुरू होता. यामुळे जामीन अर्जास सरकार पक्षाची जोरदार हरकत होती.परंतु पोक्सो कायदा अल्पवयीन मुलांच्या प्रेम प्रकरणास प्रतिबंध करण्यास अंमलात आला नसून, लहान मुलांच्या संरक्षणासाठी कायद्याचा उद्देश आहे. परंतु अनेकवेळा अल्पवयीन मुलीशी झालेल्या प्रेम प्रकरणातून गुन्हे दाखल केले जातात. अश्या वेळी आरोपी १८ ते २५ वयातील मुलांना महिनो-महिने जेलमध्ये बसावे लागते. परंतु आरोपी आणि पीडित मुली यांच्या वयातील फरक आणि त्यांच्यातील नातेसंबंध व घडलेल्या गुन्ह्याचे स्वरूप हे वासनेचे नसून त्याला भावनिकता, मैत्री आणि प्रेमाचा वलय आहे का पाहणे महत्वाचे ठरते. या प्रकरणात ही झालेल्या प्रकारामागचे वास्तव मे. कोर्टासमोर आणल्याने संपूर्ण परिस्थितीच्या सुयोग्य विचारांती मेहरबान कोर्टाने आरोपीचा जामीन अर्ज अटी व शर्थी सहित मंजूर केला आहे. नक्कीच यामुळे न्याय व्यवस्थेवरील आमचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

——- ॲड. भारत अ. सोनुले.

 

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.