WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

प्लास्टिक सर्जरीमुळे रुग्णांमध्ये नव्याने आत्मविश्वास निर्माण होईल – डॉ. संजय डी. पाटील

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीर रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या सहकार्याने उपक्रम

कोल्हापूर – डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्यावतीने गेली वीस वर्ष रुग्णांना माफक दरात आरोग्य सुविधा उपलब्ध केली जात आहे. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरामुळे रुग्णांमध्ये नव्याने आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटेल असा विश्वास डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ संजय डी पाटील यांनी व्यक्त केला.

डी वाय पाटील हॉस्पिटल कदमवाडी येथे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे उद्घाटन डॉ. संजय डी. पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते झाले. जन्मतः फाटलेले ओठ किंवा टाळू, जन्मतः लघवीचा बदललेला मार्ग, चेहऱ्याचे व्यंग, भाजल्यामुळे आलेली विद्रुपता, स्नायूंचा आखडलेपणा, बसलेले नाक व विद्रुप बोटे यावर दिल्ली, लुधियाना, बडोदा, राजकोट, पुणे येथील तज्ञ डॉक्टरांमार्फत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

यावेळी बोलताना डॉ. पाटील म्हणाले, रोटरी क्लबच्या माध्यमातून नेहमीच अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. डी. वाय पाटील हॉस्पिटलला रोटरी क्लबचे नेहमीच सहकार्य लाभले आहे. भविष्यात देखील रोटरीच्या उपक्रमाना आमचे पाठबळ मिळेल. या तीन दिवसीय शिबिरामुळे शारीरिक व्यंग असणाऱ्या किंवा शरीरावर व्रण असलेल्या अनेक रुग्णांना फायदा होणार आहे. या प्लास्टिक सर्जरीमुळे आत्मविश्वास गमावलेल्या रुग्णांमध्ये तो नव्याने निर्माण होईल याची खात्री आहे. या शिबिरात 150 हून अधिक पेशंटनी नोंदणी केली आहे. उपचारानंतर त्यांची योग्य ती काळजी हॉस्पिटल घेईल. हे सर्व रुग्ण येथून उत्तम उपचार घेऊन नक्कीच समाधानाने परत जातील याची खात्री देतो.

ते पुढे म्हणाले, डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातूनही आम्ही नेहमीच समाजातील गरजू आणि गरीब रुग्णांसाठी विविध उपक्रम राबवत आलो आहोत. हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी पूर्णपणे मोफत उपचार केले जातात. नॉर्मल असू दे किंवा सिजेरियन दोन्ही प्रकारच्या डिलिव्हरीही मोफत केल्या जात आहेत. हॉस्पिटलमध्ये आम्ही दररोज 25 -30 सर्जरी मोफत करतो. हे काम यापुढेही असेच चालू राहील.

ख्यातनाम प्लास्टिक सर्जन डॉ. एस पी बजाज म्हणाले, शारीरिक व्यंग, व्रण, फाटलेले ओठ अशा अनेक समस्या असलेले हजारो लोक प्लास्टिक सर्जरी उपचारांपासून आजही वंचित आहेत. अशा लोकांसाठी रोटरी क्लबने पुढाकार घेतला आहे. गेली २० वर्षे हा कौतुकास्पद उपक्रम राबवला जात आहे. आता डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून अधिकाधिक रुग्णांना याचा फायदा होईल असा विश्वास आहे. रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर राहुल कुलकर्णी, असिस्टंट गव्हर्नर यतीराज भंडारी, रोटरी क्लब कोल्हापूरचे प्रेसिडेंट अरुण गोयंका, रोटरी क्लब इचलकरंजीचे इव्हेंट कॉर्डीनेटर रिशी मोहंका, ख्यातनाम प्लास्टिक सर्जन डॉ. एस पी बजाज, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

यावेळी रोटरी क्लब कोल्हापूरचे सेक्रेटरी साहिल गांधी, इव्हेंट चेअरमन डॉ. अभिजीत हावळ, रोटरी क्लब इचलकरंजीचे प्रेसिडेंट संतोष पाटील, सेक्रेटरी चंद्रकांत मगदूम, डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. राकेश कुमार शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. रविद्र तहा, डॉ. राजेन्द्र गांधी, डॉ. हिरेन भट, डॉ. पियुष दोषी, डॉ. अरुण देशमुख, डॉ. शीतल मिरचूटे, डॉ. संदीप कदम, संजय जाधव, अजित पाटील आदी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.