शिराळा (जी.जी.पाटील)
सोनवडे(ता.शिराळा) येथे रथसप्तमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्री.संत तुकाराम महाराज गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताहास आज टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली.प्रारंभी दादु कुंभार,बाजीराव जाधव,गोरख डवरी,बाबासो कुंभार,प्रकाश कुंभार, वाल्मीक डवरी यांचे हस्ते कलश पुजन व ग्रंथपुजन करण्यात आले तसेच यावेळी नामदेव मुळे यांचेहस्ते विनापुजन करण्यात आले व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पारायण सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला तसेच मंदिरामध्ये अभिषेक घालण्यात आला.सोनवडे येथील ग्रामदैवत श्री जोतिर्लिंग मंदिरामध्ये रथसप्तमी निम्मीत्त होणार्या गाथा पारायण सोहळ्यामध्ये गाथावाचन, हरिपाठ,भजन,किर्तन यासारखे दैनदिन कार्यक्रम होणार आह दरम्यान यावेळी उपसरपंच सर्जेराव पाटील,रवि पाटील,शिवाजी पाटील,बाबुराव नांगरे,सुधीर बाबर,प्रकाश लोखंडे,शंकर सुतार,ग्रा.पं.सदस्य पांडुरंग बाबर आदि ग्रामस्थ उपस्थित होते.हा सप्ताह यशस्वी होण्यासाठी सोनवडे येथील पारायण मंडळ परिशम घेत आहेत.