कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या कामासाठी 70 कोटीचा निधी मंजूर -पालकमंत्री
*पालकमंत्री यांच्याकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत नगरोत्थान योजनेचा आढावा
*कोल्हापूर महानगरपालिकेला दहा कोटी तर इचलकरंजी महानगरपालिकेला नऊ कोटीचा निधी मंजूर
*जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च करु न शकणाऱ्या विभागांनी तात्काळ निधी समर्पित करावा
कोल्हापूर: महापूर व पावसामुळे कोल्हापूर शहरातील रस्त्यांची मोठी दुरावस्था झालेली आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे नवीन रस्ते तसेच रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री महोदयांनी विशेष बाब म्हणून 70 कोटीचा निधी मंजूर केला असल्याची माहिती शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत नरोत्थान योजनेचा आढावा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे मुंबई येथून घेतला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे व अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री केसरकर पुढे म्हणाले की, कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी मिळावा याबाबत मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे मागणी करण्यात आलेली होती. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिकेला रस्ते दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री यांनी 70 कोटीचा निधी मंजूर केला आहे. हा निधी त्वरित उपलब्ध होण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने नगर विकास विभाग व पालकमंत्री कार्यालयाशी नियमित संपर्क ठेवावा. या निधीतून कोल्हापूर शहरातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती करावी व आवश्यक ठिकाणी नवीन रस्ते करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
काेल्हापूरचा विकास हाेणे महत्वाचे हाेते, खराबरस्ते दुरुस्त झाल्यास शहर सुंदर दिसेल-POSITIVVE WATCH