पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण जाहीर
शिराळा (जी.जी.पाटील)
(जि.मा.का.)
जिल्ह्यातील १० पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आरक्षण सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे – पंचायत समिती मिरज – अनुसूचित जाती (महिला), पंचायत समिती शिराळा व पंचायत समिती खानापूर-विटा – नागरिकांचा मागास प्रवर्ग, पंचायत समिती पलूस – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), पंचायत समिती कवठेमहांकाळ, कडेगाव आणि तासगाव – सर्वसाधारण (महिला) आणि आटपाडी, जत, वाळवा या पंचायत समित्यांचे सभापती पद सर्वसाधारण गटासाठी सोडतीव्दारे आरक्षित करण्यात आले. कु. बिंदू बसवराज हंडगी या बालिकेच्या हस्ते चिठ्ठ्या उचलून आरक्षण सोडत काढण्यात आली.