प्रदीप शिंदे- टीम पाँझिटीव्ह वाँच
शांतिनिकेतन स्कूल समोर रास्तारोको
पाण्यासाठी नागरिक आक्रमक; वाहतूकीची मोठी कोंडी
कोल्हापूर : नियमित पाणी पुरवठा व्हावा या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी गुरुवारी सकाळी शांतिनिकेतन स्कूल वनराई पार्क समोर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी एक दिवसआड नियमित पाणी सोडण्याचे लेखी अश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
वैभव हौसिंग सोसायटी, वनराई पार्क, ग्रीन पार्क, रेव्हेन्यू हौसिंग सोसायटीसह समता काँलनीमध्ये अनियमित व कमी दाबाच्या पाण्याची समस्या कितेक वर्षापासून आहे. याबाबत महानगरपालिकेकडे कितेक दिवस वारंवार तक्रार व विचारांना केल्या जात होत्या. यातच भर म्हणजे गत अठरा दिवसापासून या परिसरात पाणीच आले नाही. गुरुवारी सकाळी जलअभियंता हर्षजित घाटगे आज भागाची पाहणी करण्यासाठी वनराई पार्क येथे आले होते.
वाहतूकीची कोंडी
पाण्यासाठी सकाळी साडेदहा वाजता रस्ता रोको केल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या, यावेळी वाट मिळेल तिथून वाहनधारक जात होते.
यावेळी माजी नगरसेवक लाला भोसले यांनी नागरिकांनी पाणी कधी देणार अशी विचारले असता लवकरच पाणी सोडण्यात येईल असे आश्वासन घाटगे यांनी दिले हे ऐकताच नागरिकांची सहनशीलता संपली आणि जलअभियंता घाटगे यांच्यावर प्रश्नाचा भडिमार करत, तुम्ही नेहमीच असेच अश्वासन देता. ठोस उपाययोजना करत नाही तो पर्यंत आम्ही रास्तारोको आंदोलन करणार असे म्हणत दुचाकी व चारचाकी रस्त्यावर आडवी लावून वाहतूक रोखण्यात आली.
सहनशीलतेचा अंत
अनेक वर्षे आठ ते दहा दिवसातून एकदा पाणी येते याबाबत वारंवार पाठपुरावा करून सुद्धा कोणी दखल घेत नव्हते. त्यामुळे आज पुन्हा जलअभियंता घाटगे यांनी अश्वासन दिल्यानंतर नागरिकांचा अंत झाल्याने संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला.
VIDEO पहा https://www.youtube.com/watch?v=whzv7-uNcdc
अचानक झालेल्या प्रकाराने एकच गोंधळ उडला, तसेच येथे वाहतूकीची मोठी कोंडी झाली. लांबच्या लांब वाहनांची रांगा लागल्या, यावेळी घाटगे यांनी नागरिकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, मात्र रहिवाशी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते.काही वेळानंतर घाटगे यांनी एक दिवस आड पाणी येईल, असे लेखी अश्वासन दिल्यानंतर रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.जर अनियमित व कमी दाबाचे पाणी आले तर पुढील वेळेस हायवे रोको असा इशारा यावेळी नागरिकांनी दिला.
हायवे रोखणार
पाणी नियमित येईल असे लेखी अश्वासन देण्यात आले, मात्र यापुढे पाणी आले नाही तर हायवे रोखणार असा इशारा नागरिकांना देण्यात आले.
आंदोलनात पी. ए. पाटील, सर्जेराव पाटील, वेंकटेश भट, चंद्रकांत बोंद्रे, दिनेशकोरगावकर, सुनिता जाधव, राजकुमार पाटील, प्रदीप शिंदे, युवराज कोले, हेमंत पाटील, शिवाजी काटकर, आदित्य सुतार, उन्मेष साठे,महेश पाटील, नरेश धूत, राजू साबळे, हेमंत आरोसकर यांच्यासह वनराई पार्क, वैभव हौसिंग सोसायटी, रेव्हेन्यू हौसिंग सोसायटी, समता काँलनी, ग्रीन पार्क येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या समस्या साेडविण्यासाठी, उठविलेल्या आवाजाला साथ देण्यासाठी पाँझिटीव्ह वाँच टीम नेहमीच आपल्यासाेबत.