सोनवडेत रथसप्तमी निमित्त पारायण सप्ताह
ज्ञानराज जोतिर्लिंग मंडळ व ग्रामस्थ घेतात परिश्रम
शिराळा (जी.जी.पाटील)
सोनवडे(ता.शिराळा) येथे रथसप्तमी निमित्त दि २१ जानेवारी ते २८ जानेवारी अखेर जगदगुरू श्री.संत तुकाराम महाराज गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोनवडे येथील ग्रामदैवत श्री जोतिर्लिंग मंदिरामध्ये रथसप्तमी निमित्त होणा-या पारायण सोहळ्यामध्ये काकड आरती, गाथावाजन, हरिपाठ,भजन,किर्तन यासारखे दैनदिन भक्तीमय कार्यक्रम होणार असुन सप्ताह कालावधीमध्ये ह.भ.प श्री.पार्थ महाराज(रामेष्टवाडी),ह.भ.प.श्री.जितेंद्र महाराज (ओंड),ह.भ,प.श्री.अभिषेक,महाराज(उंडाळे),ह.भ.प.श्री.विठ्ठल महाराज(मिरज),ह.भ.प.श्री.सागरनाथ महाराज(बेळगाव),ह.भ.प.श्री.जगन्नाथ महाराज (काळामवाडी),ह.भ.प.शंकर महाराज मोरे(आंबवडे),ह.भ.प.श्री.बाजीराव जाधव महाराज(सोनवडे) यांचे काल्याचे किर्तन आदींची किर्तनसेवा होणार आहे. व्यासपीठ चालक वाल्मिक महाराज असून विणेकरी ज्ञानराज जोतिर्लिंग मंडळाचे अध्यक्ष भगवान पाटील हे आहेत. पारायण सोहळा यशस्वी करण्यासाठी ,भगवान पाटील, दादू चंद्रु कुंभार, बाबासो कुभांर, गोरख डवरी,वाल्मिक डवरी,विक्रम पाटील, प्रकाश कुंभार, यांच्यासह पारायण मंडळाचे सर्व सदस्य व ग्रामस्थ प्रयत्न करतात.
दरम्यान हा सप्ताह यशस्वी होण्यासाठी सोनवडे येथील पारायण मंडळ परीश्रम घेत असुन या सप्ताहासाठी भाविकांनी उपस्थित रहावे असे अवाहन पारायण मंडळ व ग्रामस्थ यानी केले आहे.