धुळे जिल्ह्यातील सहकार विभागातील विविध समस्यांबाबत ८ जुलै रोजी विशेष बैठकीचे आयोजन…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

जिल्ह्यातून जास्तीत जास्त संख्येने उपस्थितीचे आवाहन…

धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध प्रकारच्या सहकारी संस्थांचे कार्यकर्ते,पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विनंती करण्यात येते की, धुळे जिल्ह्यातील उपनिबंधक सहकारी संस्था, या पदावर वर्ग 1 च्या अधिकाऱ्याची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी, यासाठी व उपनिबंधक धुळे तालुका या पदावर नियमित अधिकाऱ्याची नियुक्ती करणे आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, साक्री तालुका यांची धुळे जिल्ह्याबाहेर अन्यत्र बदली करणे आणि ज्यांच्या या संदर्भात तक्रारी आहेत किंवा जे कार्यकर्ते, पदाधिकारी व अन्य कोणी ही व्यक्ती जी सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत आणि‌ त्यांच्यावर अन्याय झालेला आहे किंवा या क्षेत्रात अन्यायाचा सामना करणाऱ्या सर्वांसाठी सोमवार दिनांक 8 जुलै 2024 रोजी दुपारी 2 वाजता धुळे जिल्हा मराठी पत्रकार भवन सभागृह, संतोषी माता मंदिर चौकाजवळ, धुळे येथे एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीला आयोजक मोहन पाटील, गोपाल मारवाडी, ए. एन. चौधरी, पी. बी. सोनवणे, डॉ. सरोजताई पाटील, हिरालाल कोळी (वाकडे), एस. एन. विसपुते, ॲड. गोपालसिंह राजपूत, टी. एस. देवरे, ओंकार जाधव, शिवाजीराव बोरसे पाटील, के. एन. पाटील, ॲड हिरालाल परदेशी आदींनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सर्व संबंधित कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातून जास्तीत जास्त संख्येने या विशेष बैठकीत उपस्थित रहावे ही विनंती.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.