पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
|
पुणेः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या सातारा जिल्ह्यातील आपल्या दरे या मूळगावी गेले आहेत. ते पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यालाही उपस्थित राहिले नाही. प्रारंभी ते या कार्यक्रमाला ऑनलाइन हजर राहतील असे सांगण्यात आले. पण ते ऑनलाइनही हजर राहिले नाही. त्यातच आता संजय शिरसाट यांनी त्यांच्या तब्येतीविषयी माेठे विधान केले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खूप खराब आहे. त्यामुळे आम्ही त्यांना 15 ऑगस्टनंतर बळजबरीने रुग्णालयात ॲडमिट करणार आहोत, अशी माहिती शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी शनिवारी दिली. त्यांच्या या विधानामुळे मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीविषयी उलटसूलट चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 तास काम करतात. हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आम्ही सर्व आमदारांनी त्यांना डॉक्टरांकडे जाण्याची विनंती केली आहे. 15 ऑगस्ट नंतर आम्ही त्यांना ‘बळजबरी’ने… हा शब्द मुद्दाम लक्षात ठेवा. आम्ही त्यांना बळजबरीने हॉस्पिटलमध्ये पाठवणार आहोत. त्यांची तब्येत एवढी खराब आहे की, त्याची कल्पना तुम्हाला नसेल. आम्ही जवळ राहतो. आम्हाला माहिती आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
|
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.
आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.
Post Views: 237