पुणे येथे राज्य स्केटिंग संघटनेच्या वतीने राष्ट्रीय पदक विजेत्या स्केटिंगपटूंचा सत्कार…
कोल्हापूर : स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (सेॅम) यांच्या वतीने दिनांक 19 रोजी पुणे जिल्हा स्केटिंग असोसिएशन आयोजित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्केटिंग पट्टूंचा सत्कार समारंभ करण्यात आला हा कार्यक्रम पुणे महानगरपालिकेच्या येरवडा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये घेण्यात आला. समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक श्री अविनाश साळवी. राज्य संघटनेचे अध्यक्ष. पी. के. सिंग. उपाध्यक्ष डॉ. महेश कदम. सचिव डी. एस. बुलंगे. माझी ए. सि. पी श्री. जोशी (साहेब) आशुतोष जगताप. श्रीपाद शिंदे. यांच्या उपस्थितीत गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये कोल्हापुरातील जिल्हा संघटनेच्या खेळाडूंनी बेंगलोर येथील राष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवले होते. त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती पुढील प्रमाणे…
१)तेजस्विनी कदम(रौप्य पदक)
२)ॲड.धनश्री कदम (रौप्य पदक)
३)पृथ्वीराज पिलाई (रौप्य पदक)
४) सिद्धवी माने (कास्य पदक)
यांचा समावेश आहे. या सर्वांना आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक डॉ. महेश कदम जिल्हाध्यक्ष अनिल कदम ॲड. धनंजय पठाडे, आकाराम पाटील, अजित मोहिते, संजय संभाजी, संभाजी पाटील, जगदीश दळवी यांचे मार्गदर्शन लाभले.