संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनासाठी तातडीची बैठक — महिलांचा संकल्प, नागपूर सज्जतेकडे; इस्लामपूर बैठकीत पथनाट्याने रंग भरले!
POSITIVE TEAM :संत शिरोमणी नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन दिनांक १७ व १८ जानेवारी २०२६ रोजी नागपूर येथे भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे. या ऐतिहासिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण महासंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी नागपूर येथे मुख्य संयोजक ईश्वर धिरडे यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली.
या बैठकीस प्रमुख पदाधिकारी, नामवंत सामाजिक कार्यकर्ते, तसेच समर्पित महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. समित्यांची रचना, कार्यविभागांचे नियोजन, आणि प्रचाराच्या माध्यमातून संपूर्ण भारतात संमेलनाचा संदेश पोहोचवण्याबाबत सखोल चर्चा झाली. महिला प्रतिनिधींनी विशेषतः अत्यंत आत्मविश्वासाने संमेलनासाठी झोकून देऊन काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.
“ही जबाबदारी म्हणजे केवळ कामगिरी नव्हे, तर पवित्र सेवा आहे,” असे त्यांनी नमूद केले. नागपूरच्या एकात्मतेचा संदेश ‘नागपूर एक आहे, आणि एक राहील’ या घोषणेने अधोरेखित करण्यात आला.
दरम्यान, या महासंमेलनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथेही कै. सुधीरदादा पिसे यांच्या जन्मभूमीत बैठक पार पडली. या बैठकीचे नेतृत्व मुख्य संयोजिका उषाताई पोरे, मीनलताई कुडाळकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी महिलांनी सादर केलेल्या “संत नामदेव समाधी सोहळा” या पथनाट्याने वातावरण भारावून टाकले.
रत्ना उत्तरकर, सुरेखा कोकणे, सुजाता वनारसे, करिना घम, आशा मिरजकर आदी कलाकारांनी विविध भूमिकांतून संत नामदेव महाराजांचे विचार आणि जीवन उभे केले. “देह विठ्ठल” या गाण्याने सोहळ्यास धार्मिक आणि भावनिक उंची दिली.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.या दोन बैठकींतून एक स्पष्ट संदेश मिळतो — संपूर्ण महाराष्ट्र संमेलनासाठी सज्ज झाला आहे. महिलांचे योगदान, कार्यकर्त्यांची एकजूट, आणि नामदेव महाराजांच्या विचारांप्रती असलेली निष्ठा या महासंमेलनाला यशस्वी आणि ऐतिहासिक बनवेल हे निश्चित!











































































