WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

‘ना टायर्ड हू ना रिटायर्ड हू’ …शरद पवारांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेतून लढण्याचे दिले संकेत…

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

छगन भुजबळांना येवला मतदारसंघ कसा दिला याचा इतिहासच शरद पवारांनी सांगितला…

नाशिक – नाशिकला येत असताना वरुणराजाने आपले चांगले स्वागत केले याचा आनंद शरद पवार यांनी व्यक्त करतानाच उपस्थित नाशिककरांना पावसाची स्थिती काय आहे अशी विचारणा केली त्यावेळी पुरेसा पाऊस नाही ही बाब शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी शरद पवार यांनी आम्ही निघाल्यावर पावसाचे थेंब जसे टाकले तसे संबंध जिल्हयात, राज्यात पावसाचा शिडकाव कर आणि शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लाव अशी प्रार्थना वरुणराजाकडे केल्याचे माध्यमांना सांगितले. नाशिककरांनी यशवंतराव चव्हाण यांना अविरत साथ दिली आणि म्हणून इतिहास असलेल्या नाशिकची निवड केली; शरद पवारांनी सांगितले कारण…रस्तोरस्ती लोकांचे चेहरे आणि हावभाव बघता मला माझी भूमिका सामान्य लोकांच्या चेहर्‍यावर मला पहायला मिळाली. केवळ वयच नाही तर प्रकृती चांगली ठेवली तर त्या प्रकृतीने चांगली कामे करायला वय कधी अडथळे आणत नाही.

नाशिकला स्वातंत्र्याच्या इतिहासात वेगळे महत्व आहे. कॉंग्रेस पक्षाचा इतिहास बघितला तर नाशिकला कॉंग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन झाले होते. स्वातंत्र्यानंतर अनेक उत्तम मार्गदर्शक या शहरातून उपलब्ध झाले. त्यावेळी आमच्या तरुणांचे सामाजिक व राजकीय आदर्श स्वर्गीय यशवंतराव चव्हाण होते. ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. चीनचे संकट देशावर आल्यानंतर जवाहरलाल नेहरुंनी त्यांना दिल्लीत बोलावून घेतले आणि देशाच्या रक्षणाची जबाबदारी संरक्षण मंत्री म्हणून दिली. चव्हाणसाहेबांचा लोकसभेत प्रवेश हा नाशिकमधून झाला होता. नाशिककरांनी त्यांना अविरत साथ दिली ही पार्श्वभूमी आहे. त्यामुळे आपल्या कामाची सुरुवात नाशिकमधून करावी वाटल्याने आज दौऱ्याची सुरुवात केल्याचे शरद पवार पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

 

मी नाशिकला रस्त्यावरून येताना लोकांचे चेहरे, त्यांचे हावभाव बघितल्यानंतर आत्मविश्वास वाढला पण त्यापेक्षा माझी भूमिका सामान्य लोकांच्या चेहर्‍यावर मला पहायला मिळाली त्याचा मला आनंद झाला असेही शरद पवार म्हणाले. छगन भुजबळ यांचा मुंबईत पराभव झाल्यानंतर त्यांनी विधानसभेत आपली आवश्यकता असल्याची इच्छा व्यक्त केली आणि मग नाशिकच्या लोकांशी चर्चा केल्यानंतर येवल्यातून निवडणूक लढवावी असे सूचवले. येवला आमच्या विचारांचा तालुका आहे. १९८० साली आम्ही कॉंग्रेसमधून बाहेर पडलो. कॉंग्रेस (एस) पक्ष स्थापन केला. त्यावेळी नाशिककरांनी सर्व जागा आम्हाला निवडून दिल्या. लागोपाठ दोनदा जर्नादन पाटील हे निवडून आले होते. त्यामुळे भुजबळसाहेबांना सेफ जागा द्यायची होती म्हणून त्या मतदारसंघातील लोकांची संमती घेतली व आम्हाला यश आले असेही छगन भुजबळ यांना येवला मतदारसंघ कसा दिला याचा इतिहास शरद पवार यांनी माध्यमांना सांगितला.

वयानुसार थांबले पाहिजे या अजितदादा पवार यांच्या वक्तव्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेतील ‘ना टायर्ड हू ना रिटायर्ड हू’ या ओळीची आठवण शरद पवार यांनी करुन दिली. आताच्या मंत्रीमंडळात ६० ते ७० वयोगटातील लोक आहेत. १९७८ मध्ये मुख्यमंत्री होतो त्यावेळी एक व्यक्ती माझ्या नजरेसमोर होती त्यांचे नाव मोरारजी देसाई होते. ते पंतप्रधान असताना त्यांचे ८४ वय होते. वय असते… नाही असे नाही… पण केवळ वयच नाही तर प्रकृती चांगली ठेवली तर त्या प्रकृतीने चांगली कामे करायला वय कधी अडथळे आणत नाही असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.