WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

जगात कुठेही जा परंतु मराठी भाषेला विसरू नका…

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस 

मराठी भाषेचा गोडवा  हा जगावेगळा असल्याचे जगजाहीर आहे. 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड वि.वा.शिरवाडकर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने “मराठी भाषा दिवस” म्हणुन साजरा केला जातो.या दिवसाला आगळे वेगळे महत्व असुन या दीवसाला जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा गौरव दिन म्हणुनही साजरा केला जातो. मराठी भाषेतील अग्रगण्य व श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समिक्षक विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी पुणे येथे झाला.त्यांनी अनेक माध्यमांच्या सहाय्याने  मराठी भाषेचा जगभर प्रसार करून मराठी भाषेचे नाव लौकीक केले व गौरान्वीत केले.त्यामुळेच जगातील मराठी भाषीक 27 फेब्रुवारीला “जागतिक मराठी दिवस” म्हणुन  साजरा करतात.मराठी भाषेचा गोडवा हा जगावेगळा आहे.मराठी भाषा सोज्वळ आणि सोपी असल्याने कोणीही तीला सहज अवगत करू शकते.

महाराष्ट्राची मातृभाषा ही भारतासह संपूर्ण जगाला वेगळाच आनंद प्रदान करीत असते.मराठी भाषेत महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आहे.याची जोपासना करण्याचे दायित्व संपूर्ण मराठी भाषीकांवर आहे.मराठी मांनसाचे कर्तव्य बनते की मराठी भाषा जगातील मानसाच्या ह्रदयात व रक्तात कसे  रूजवीता येईल याकडे सर्वांचे लक्ष असले पाहिजे.कारण ही मराठी भाषेची भुमी हिंदविस्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज,साधु-संत, थोर महात्मे, क्रांतीकारक, समाजसुधारक यांच्या संकल्पनेतून व संस्कारातुनच मराठीचा उगम झालेला आहे.मराठी भाषेला जिवीत ठेवण्याचे काम वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांनी संपूर्ण ताकदीनिशी केले आणि जगभरात मराठीचा डंका वाजवीला.त्यामुळेच त्यांच्या जन्मदिनी म्हणजे  27 फेब्रुवारीला जागतिक मराठी भाषा दिवस म्हणुन साजरा केला जातो.या दिवसाला जगातील संपूर्ण मराठी भाषीक “मराठी भाषा गौरव दिवस” म्हणून साजरा करतात. आपल्या पुर्वजांनी मराठी भाषेचा गौरव वाढविण्यासाठी व मराठीचा ठेवा मजबूत करण्यासाठी संपूर्ण ताकद लावली.परंतु आताची नवीन पिढी मराठीचे मुळ शब्दच विसरल्याचे दिसून येते.

आई-बाबा,काका-काकु,मामा-मामी, आजी-आजोबा या शब्दाचा विसरपडुन मम्मी-पप्पा,अन्टी, डॅडी,ग्रॅडफादर-ग्रडमदर इत्यादी इंग्रजी शब्द मराठी भाषेत घर करतांना दिसत आहे.यामुळे मराठी भाषेतील अम्रृतवाणी नष्ट होवू शकते.याला नाकारता येत नाही.भारतात 28 राज्य 8 केंद्र शासीत प्रदेश आहेत. यामुळे भारताचा विचार केला तर 19500 हुन अधिक मातृभाषा आहेत.त्याचप्रमाणे इंग्रजी भाषेसह अनेक भाषा आहेत.त्या शिकाव्या व अवगत कराव्यात परंतु आपल्या मातृभाषेला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी मुख्यत्वेकरून आजच्या पिढीने घेतली पाहिजे.आपल्यासाठी मराठी भाषा ही गंगेसारखी निर्मळ व तुळशीच्या वृक्षासारखी पवित्र आणि वटवृक्षासारखी अफाट भाषा आहे.त्यामुळे मराठी भाषेचा जेवढा प्रचार करतात येईल तेवढा केलाच पाहिजे.मातृभाषा मराठी ही आईची भूमिका बजावीत असते तर राष्ट्रभाषा हिंदी ही वडीलांची भुमिका पार पाडते.भारतात 19500 पेक्षा अधिक मातृभाषा आहेत.परंतु या संपूर्ण भाषेमध्ये सोपी,सोज्वळ,मधुर आणि सहज अवगत होणारी एकमेव भाषा म्हणजे “मराठी भाषा”त्यामुळे आजच्या नविन पिढीने आपल्या मायबोली मराठीला न विसरता त्याची जोपासना केली पाहिजे.यातच महाराष्ट्राचा आणि मराठी भाषीकांचा गौरव आहे.

महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे घोषित झाले.त्यामुळे मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे जेष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो.मराठी भाषा महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण जगाला सुशोभित करणारी भाषा आहे.मी नवीन पिढी ला आग्रह करेल की कमीत कमी मराठी वृत्तपत्रे नेहमीच्या वाचनात आणावी यामुळे मराठी भाषेचा मान उंचावेल.त्याचप्रमाणे मराठी भाषेला जीथे-जीथे रूजवीता येईल तीथे-तीथे रूजवुन मराठी भाषेला प्रज्वलीत करण्याचे काम आधुनिक युगात नवीन पिढीने केले पाहिजे.महाराष्ट्रातील कोणत्याही धर्माचा व्यक्ती असो किंवा पंथाचा व्यक्ती असो तो मराठीचा सन्मानच करतो.परंतु मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मराठीला जगभरात कशी सुर्यासारखी तेजस्वी करता येईल याकडे संपूर्ण मराठी भाषीकांनी लक्ष दिले पाहिजे व मराठी भाषेचे नाव सुवर्ण अक्षरात कोरल्या गेले पाहिजे.याच मराठी भाषेने पोवाडा,कीर्तन,भजन,भारूड,लावनीच्या माध्यमातून इंग्रजांना सळोकीपळो लावले व समाज जागृतीचे काम केले.

आपण ज्या मातीत जन्म घेतला आणि ज्या भाषेच्या बळावर लहाण्याचे मोठे झालो.अशा मराठी भाषेचा प्रवास न थांबता संपूर्ण जगात झाला पाहिजे.तेव्हाच मराठी भाषेची मान आणखी उंचावेल व कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त खरी श्रद्धांजली ठरेल असे मला वाटते.ज्या मातीत आपण जन्म घेतला तेथील भाषेची पुजाअर्चना व्हायलाच पाहिजे कारण ती आपणासर्वांसाठी पुज्यनीय आहे.आज दक्षिण भारतातील मातृभाषेचा विचार केला तर ती इतरांसाठी बोलायला व वाचायला अवघड व कठीण वाटते.त्यामुळे या भाषांचा प्रसार जास्त होवु शकला नाही.परंतु आज मराठी भाषा जगभरात ऐकायला व पहायला मिळते ही आनंदाची व गौरवास्पद बाब आहे.महाराष्ट्रातील मराठी भाषेचा विचार केला तर भारतातील काणा-कोपऱ्यातील व्यक्ती सहज अवगत करीत असतो.त्यामुळे देशातील इतर राज्यांतील लोक महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दिसून येतात.यामुळेच मुंबईला देशाच्या आर्थिक राजधानीचा दर्जा मिळाला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मराठी भाषा सोपी,सोज्वळ,निर्मळ आणि शांत स्वरूपाची आहे.या वैभवशाली महाराष्ट्रातील मराठी भाषा संपुर्ण जगात आकाशातील चांदण्यांसारखी चमकायला पाहिजे.

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सर्वांनी  माय मराठी,माझी मराठी, मी मराठी, मातृभाषा मराठी यापध्दतीने जोपासना व्हायलाच पाहिजे.कारण मराठी भाषा हा आपल्या पुर्वजांचा ठेवा आहे आणि ईश्वरी देण सुध्दा आहे.त्यामुळे मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त कसा करता येईल याकडे सर्वांनीच लक्ष देण्याची गरज आहे.कारण मराठी भाषेचा इतिहास, संस्कृती, वारसा याला उंच शिखरावर नेण्याची जबाबदारी युवा पिढीवर आहे.कारण जगात अनेक देशांमध्ये मराठी भाषा बोलली जाते. महाराष्ट्रात जर आपण फिरायला निघालो तर प्रत्येक 40 किलोमीटर अंतरावर आपल्याला मराठी भाषेचा वेगवेगळा गोडवा दिसून येतो.कारण मराठीच्या प्रत्येक शब्दात मधुरता आणि सुसंगतपणा दिसून येतो.भारतासर संपूर्ण जगात सहज आणि सोपी भाषा असेल तर फक्त “मराठी भाषा”.

मराठी भाषा ही महाराष्ट्राचा राष्ट्रीय पक्षी मोराचा तुर्रा आहे तर जगाचा पीसारा आहे.त्यामुळे या गोडव्यामध्ये कुठेही खींडार पडणार नाही याची जबाबदारी भारतासह जगातील संपूर्ण मराठी भाषीकांनी घेतली पाहिजे.आज जगात मराठी भाषेचा वेगळा ठसा उमटवीण्याची वेळ आली आहे.कारण आज मराठी भाषा नदीच्या प्रवाहासारखी जलदगतीने जगात प्रवेश करीत आहे व तीला समुद्रासारखे अफाट करण्याचे दायित्व संपूर्ण मराठी भाषीकांवर आहे.त्यामुळे मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आपण शपथ घेवुया की मराठी भाषा जगभर पसरवीण्याकरीता आम्ही कटीबद्ध आहोत.

रमेश कृष्णराव लांजेवार.         (माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर) मो.नं9921690779, नागपूर.

मराठी भाषेला माझा मानाचा मुजरा.जगात वाढते प्रदुषण आणि निसर्गाचा होत असलेला ह्यास यामुळे पृथ्वीचे संतुलन दिवसेंदिवस डगमगत आहे.यामुळे भूकंप, सुनामी, अती उष्णता,अती थंडी, ग्लेशियर वितळने, समुद्राची पातळी वाढणे अशा अनेक भयावह घटना होत आहे.याला रोखण्यासाठी निसर्गाला वाचविणे गरजेचे आहे.याकरीता आजच्या दिवशी जगातील संपूर्ण मराठी भाषिकांनी मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले तर एकाच दिवशी लाखो झाडे लावल्या जातील.यामुळे सर्वत्र हिरवागार गालिचा निर्माण होईल व यामध्ये आपल्याला मराठी भाषेचा वेगळाच आनंद, गोडवा व सुगंध अवश्य दिसून येईल व जगात मराठी भाषेची आगळीवेगळी प्रतीमा पहायला मिळेल आणि जगात एक चांगला संदेश जाईल.

भरडधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्या-हेमंत पाटील

 

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.