WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

ELECTION आकुर्डेच्या माळावर मिनि टेक्सस्टाइल पार्क व सुतगिरणी प्रकल्प उभारणार – प्रकाश आबिटकर

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

आयुष्यभर गोर-गरीबांच्या जमिनी हडपणाऱ्यांनी आम्हाला तत्त्वज्ञान शिकवू नये…

आजरा प्रतिनिधी – ज्यांनी गोरगरिबांच्या जमिनी लाटण्यामध्ये आयुष्य घालवले. देवस्थान जमिनी लाटल्या. मागासवर्गीय समाजाच्या जमिनी लाटल्या. आपल्याच भावकीतल्या 16 पाटलांच्या जमिनी दादागिरी ने हडपल्या. हुतात्मा सूतगिरणीसाठी नोकरी लावतो लावतो म्हणून घेतलेल्या जमिनींचे अद्याप पैसे न दिलेल्यांनी आम्हाला तत्त्वज्ञान शिकवण्याची गरज नाही. आकुर्डे येथील भुतोबाच्या पठारावर दीडशे कोटी रुपयांचा टेक्स्टाईल पार्क व ऐंशी कोटींचा सुतगिरणी प्रकल्प उभा करणार तसेच आजरा एमआयडीसी विस्तारीकरणासाठी मंजुरी घेतली आहे. यामुळे रोजगार निर्मिती व औद्योगिक विकास चालला मिळणार असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. ते येथील जनता सहकारी गृहतारण संस्था व मराठा महासंघ यांच्या वतीने केलेल्या आयोजीत केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे होते.

, राधानगरी मतदार संघ हा भौगोलिक दृष्ट्या दुर्गम व डोंगराळ आहे. येथील बहुतांशी क्षेत्र वनविभागाच्या अखत्यारित असल्यामुळे औद्योगिक प्रकल्प उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व अडचणींची सोडवणूक करत राधानगरी तालुक्यासाठी कौलव येथील गायरान जमिनीमध्ये मिनी एमआयडीसी मंजूर केली होती त्याचे काम देखील सुरू करण्याची निविदा प्रसिद्ध करण्यात आली मात्र माजी आमदार के. पी. पाटील यांनी या प्रकल्पात देखील खो घातला. त्यामुळे राधानगरी वासियांचे एमआयडीसी चे स्वप्न अपूर्ण ठेवण्यास के. पी. पाटील हेच जबाबदार आहेत. त्यांनी आपल्या आमदारकीच्या दहा वर्षांच्या काळात आकुर्डे एमआयडीसीतील शेतकऱ्यांना प्रति गुंठा साडेतीन हजार रुपये रक्कम देऊ न शकल्यामुळे हा प्रकल्प काळानुरूप रखडत गेला. परिणामी येथील शेतकऱ्यांनी आम्हाला एमआयडीसी प्रकल्प नको अशी मागणी लावून धरली त्यामुळे भुदरगड तालुक्याची एमआयडीसी देखील रखडण्याचे महापाप हे के.पी. पाटील यांचेच आहे. परंतु त्याच आकुर्डे येथील भूतोबाच्या माळावर या तालुक्याचे सुपुत्र असलेले राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दीडशे कोटी रुपयांचा मिनी टेक्स्टाईल पार्क व ऐंशी कोटी रुपयांची सुतिगिरणी उभारणी करून औद्योगिक विकासास चालना देणार आहे. यामुळे याच ठिकाणी शेकडो तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. पुढील काळात राधानगरी वासियांचे एमआयडीसी चे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. आजरा येथील एमआयडीसीच्या विस्तारीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने सरकारी हक्कातील एमआयडीसी साठी संपादित करण्यात आली असून त्याकरिता 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्याचेही काम आचारसंहिता झाल्यानंतर सुरू करण्यात येईल. पण के. पी. पाटील यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात औद्योगिक विकासासाठी कोणतीही ठोस कामगिरी केली नाही. उलट आम्ही मंजूर केलेली एमआयडीसी बंद करण्याचे काम केले हे राधानगरी विधानसभा मतदारसंघातील सुज्ञ जनता जाणून आहे. या अशा कपट-कारस्थानाने बरबटलेल्या व्यक्तीस जनता कायमचे हद्दपार करील.

यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण, आजी-माजी सैनिक वेल्फेअर फाउंडेशनचे दत्तात्रय मोहिते, शेतकरी मंडळाचे संभाजीराव इंजल, उद्योजक विजयकुमार पाटील, नाथा देसाई, सुधीरभाऊ परळकर, प्रकाश देसाई, शंकरराव शिंदे आदींसह उद्योजक उपस्थित होते. प्रास्ताविक मारुती मोरे यांनी केले. आभार बंडोपंत चव्हाण यांनी मानले.

आज-याच्या उद्योजकांकडून आ. आबीटकर यांचे अभिनंदन…
आजरा एमआयडीसीचे विस्तारीकरण करावे अशी उद्योजकांची मागणी केली होती या मागणीची पूर्तता आ. आबिटकर यांनी केल्याबद्दल उद्योजकांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

चोराच्या उलट्या बोंबा…
राधानगरी तालुक्याला मंजूर केलेली एमआयडीसी प्रकल्प के.पी.पाटील यांच्या कपटकारस्थानामुळे रद्द झाली. चोराच्या उलट्या बोंबा या उक्तीप्रमाणे प्रमाणे जावई व के. पी.पाटील यांची कथनी व करणी स्वाभिमानी राधानगरी वाशीय विसरणार नाहीत.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.