शैलेश बलकवडे यांची पुणे येथे राज्य राखीव पोलिस दल समादेशक म्हणून बढतीवर बदली…
कोल्हापूर : कोल्हापूरचे नवे जिल्हा पोलिस प्रमुख पदी महेंद्र कमलाकर पंडित यांची नियुक्ती झाली आहे. बुधवारी (दि. २४) सांयकाळी त्यांच्या नियुक्तीचा आदेश काढण्यात आला. जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यांची पुणे येथे राज्य राखीव पोलिस दल बल गट क्रमांक एकचे समादेशक म्हणून बढतीवर बदली झाली आहे.
महेंद्र पंडित हे मुंबई येथे आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाचे उपआयुक्त म्हणून कार्यरत होते. भारतीय पोलिस सेवेचे २०१३ च्या बॅचचे अधिकारी असलेले पंडीत यांनी सहाय्यक पोलिस अधिक्षक म्हणून गडचिरोली येथे तर पोलिस अधिक्षक म्हणून नंदूरबार येथे काम केले आहे.