आधी चांगले रस्ते करा खड्डे मुक्त शहर करा स्पीड ब्रेकर कायदेशीर मान्यतेनुसार करा पार्किंगची सुविधा द्या आणि मगच हेल्मेट सक्तीचा निर्णय घ्या. अन्यथा कोल्हापूर शहरात उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन यांच्यातर्फे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देण्यात आला. यावेळी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना सचिव हेमंत दिसले उपाध्यक्ष भाऊ घोगळे प्रकाश केसरकर यांच्यासह प्रकाश भोसले स्वप्निल कदम सागर महेकर सुरेश मयेकर सागर भांडवलकर ऋग्वेंद्र पाटील राकेश फराकटे उपस्थित होते.
|
हे निवेदन सहाय्यक प्रादेशिक अधिकारी राेहीत काटकर यांनी स्विकारले. यावेळी अध्यक्ष सुभाष जाधव म्हणाले की, हेल्मेट सक्तीला विराेध नाही.. मात्र आधी चांगले रस्ते, खड्डेमुक्त शहर आणि पार्किंगची याेग्य व्यवस्था करा, त्यानंतरच हेल्मेट सक्तीचा निर्णय घ्यावा अशा सूचना केल्या. याकडे महापालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दूर्लक्ष आहे. जाे पर्यंत या सुविधा प्राधान्याने साेडविल्या जात नाहीत, ताेपर्यंत हेल्मेट सक्ती बंधनकारक करू नये, केल्यास काेल्हापूर डिस्ट्रीक्ट लाँरी आँपरेटर्स असाेशिएशन उग्र आंदाेलन छेडेल. व निर्णय मागे घेण्यास भाग पाडेल, सुविधा नाही तर हेल्मेट सक्ती नाही असाच इशारा देत, कायदा सुव्यवस्था बिघडल्यास आपलेच प्रशासन यास जबाबदार असेल असाही इशारा सुभाष जाधव यांनी दिला.
सहाय्यक प्रादेशिक अधिकारी राेहीत काटकर यांनी निवेदन स्विकारत, संबंधित प्रशासन व वरिष्ठ स्तरावर आपल्या मागण्या, भावना पाेहाेचवित असे सांगत, कायद्याच्यादृष्टीने आणि व्यक्ती, वाहनचालकाच्या सुरक्षेतेसाठी हेल्मेटचा वापर देखिल तितकाच महत्वाचा आहे असे सांगितले. कायद्याचे नियम व पालन करण्याची जबाबदारी देखिल सर्वांची आहे. तर प्रशासकीय सुविधा मिळणे हा प्रत्येक नागरिकांचा अधिकार आहे असे स्पष्ट केले. |
निवेदन देताना उपाध्यक्ष भाऊ घाेगळे, हेमंत डिसले, शिवाजी चाैगुले, पंडीत काेरगावकर, विलास पाटील, विक्रम पाटील, उमेश महाडीक, सतिश ढणाल, जयराज जाधव, रवी चाैगले, अजित माने, अब्दुल कटगिरी यांच्यासह वाळू वाहतूक संघटेचे विजय तेरदाळकर, याेगिराज केसरकर विजय पाटील महेश डाेईजड, अतुल जाधव उपस्थित हाेते. प्रकाश भाेसले, स्वप्निल कदम, सागर महेकर, सुरेश महेकर, सांगल भांडवलकर, सहदेव पाटील, राकेश फराटके यांनी देखिल कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्या या निर्णयाला पाठिंबा देत, प्रादेशिक अधिकारी यांची भेट घेतली.