काेल्हापूरः राज्यात आज शुक्रवारी मुंबई-पुण्यासह कोकणात जोरदार पावसाचा अंदाज आहे. आज पालघर, ठाणे, रायगड, पुणे या चार जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात मध्यम, विदर्भात बहुतेक ठिकाणी जोरदार वारे वाहून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले आहे. अनेक ठिकाणी रस्ता खचण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या पाचही जिल्ह्यातील शाळांना आजही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच येथील नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुंबई, रत्नागिरी, सातारा, यलो अलर्ट : सिंधुदुर्ग, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, परभणी, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा दणका सुरूच असून, अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. पालघर, ठाणे, रायगड, पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ तर मुंबई, रत्नागिरी आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर सिंधूदुर्ग, नंदूरबार, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट), उर्वरित विदर्भात विजांसह पावसाचा, तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.