राजारामपूरी पोलीस ठाणे ०७ आरोपींचे विरुध्द व गोकुळ शिरगांव पोलीस ठाणे येथे ०४ आरोपीविरुध्द गुन्हे दाखल
कोल्हापूर : शहर व परिसरातील दारू निर्मिती केंद्र आणि कुणी अधिवेशन शाखेने उध्वस्त केली. कंजारभाट वस्ती, मोरेवाडी व साईनगर कंजारभाट वस्ती कणेरीवाडी येथे पहाटेचे वेळी गावठी हातभट्टीची दारु तयार करतानाची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली. यात राजारामपूरी पोलीस ठाणे, कोल्हापूर येथे ०७ आरोपींचे विरुध्द व गोकुळ शिरगांव पोलीस ठाणे येथे ०४ आरोपीविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत.राजारामपुरी पोलीस ठाणेचे हद्दीत ०७ हातभट्टीवर व गोकुळ शिरगांव पोलीस ठाणेचे हद्दीत ०४ अशा एकूण ११ गावठी दारु तयार करणा-या हातभट्टीवर कारवाई केली.
५९२ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु व इतर साहित्य असा एकूण ३.३७,१६०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन जागीच नाश केला आहे.ही कारवाई महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र कळमकर व त्यांच्या पथकाने केले. या पथकात सहा पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अमंलदार संजय पडवळ, युवराज पाटील, संजय हुंबे, वसंत पिंगळे, अमित मदाने, दिपक घोरपडे, अमित सर्जे , संजय कुंभार, यशवंत कुंभार, हंबीरराव अतिग्रे, सागर माने, विजय इंगळे, विशाल खराडे, प्रविण पाटील, शिवानंद मठपती, महिला पोलीस अमंलदार प्रज्ञा पाटील व तृप्ती सोरटे सहभागी होते.