ELECTION-आता लाडकी बहिण निवडणूक लढविणार… अर्ज भरणार!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

शिरोळ विधानसभेसाठी लाडकी बहीण संघटनेतून शिला हेगडे यांनी पहिल्याच दिवशी घेतला उमेदवारी अर्ज

शिराेळ-  सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. एका पेक्षा एक मातब्बर नेते, सत्ता मिळावी यासाठी विविध पक्षांचे उबरठे झिजवितायेत. या पक्षातून त्या पक्षात उड्या मारण्याचे प्रकार सुरु आहेत. आघाडी, युती.. महापरिवर्तन सारखे विविध पक्ष पुढे सरसावत असतानाच. आता आणखी एक आव्हान पुढे येत आहे. सर्वांनाच सत्ता हवीय.. बदल हवाय.. महायुती नकाे.. आहे. तर काहींना आघाडी नकाे.. कोण येणार काेण नाही. हे अजून दुरचे गणित मात्र याच निवडणुकीच्या पाडापाडीच्या राजकारणात, सत्ता मिळविण्याच्या शर्यतीत आता एक लाडकी बहिण पुढे आली आहे. काेल्हापूर जिल्ह्यातीतल शिराेळ तालुक्यातील राज्यातील लाडकी बहिणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सारखे मुख्यमंत्रीच भाऊ म्हणून पुन्हा सत्तेत यावेत यासाठी एक लाडकी बहिण थेट निवडणुकीतूनच अन्य पक्षातील नेतेमंडळींना, इच्छकांना आव्हान देणार आहे. अशा या लाडक्या बहिणीचे नाव आहे. शिला हेगडे… काेल्हापूर जिल्ह्यातील शिराेळ तालुक्यातील लाडकी बहिण संघटनेतून शिला हेगडे यांनी निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे राज्यातून पहिलीच लाडकी बहिण आता लाडकी बहिण संघटनेकडून उभी राहणार असल्याने सर्वांच्या नजरा या लाडक्या शिला हेगडे बहिणीकडे लागल्या आहेत.

शिला हेगडे, संभाव्य उमेदवार

लाडकी बहीण संघटनेतून शिला हेगडे यांनी पहिल्या दिवशी अर्ज घेतला. मुख्यमंत्री भावांनी सर्व महिलांसाठी धाडसी निर्णय निर्णय घेऊन लाडकी बहीण योजना चालू केली, आणि कल्याणकारी योजना या सर्व योजनांची परतफेड करण्यासाठी शिरोळ विधानसभा मतदार संघातून लाडकी बहीण संघटनेच्या माध्यमातून शिरोळ विधानसभा लढवण्यासाठी विढा उचलला आहे. पुन्हा एकनाथ शिंदे हेच सरकार येण्यासाठी शिरोळ तालुक्यातील बहिणींनी मला विधानसभेत पाठवण्यासाठी विढा उचलला असल्याचे शीला हेगडे स्वतः सांगितले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.