इंजिनीअर्स ऑस्ट्रेलियाची नवीन होतकरू इंजिनियर्सची त्या गाईड देखील आहेत.
कोल्हापूर: सन २०२३-२५ साठी “अर्बन डेव्लपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ ऑस्ट्रेलिया”च्या व्हिक्टोरिया राज्य कार्यकारिणी सदस्यपदी तरुण भारतीय महिला अभियंता ईशा संजीव सरनाईक यांची निवड झाली. त्या मूळच्या कोल्हापूर येथील आहेत.
इंजिनीअर्स ऑस्ट्रेलियाची नवीन होतकरू इंजिनियर्सची ती गाईड देखील आहे. “आउटलूक यंग प्रोफेशनलस् समितीत निवड झाल्याने माझ्यासारख्या एका भारतीय तरुणीला, पुढारलेल्या देशातील नव अभियंत्यां साठी काम करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या भारत देशाचे नाव उंचावण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे” असे इशाने सांगितले. शालेय शिक्षण मुंबई येथे झाल्यावर, बंगळुरूतून बी.टेक. सिव्हिल केल्यावर, ग्रिफिथ विद्यापीठ येथून मास्टर्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मास्टर्स इन इंजिनिअरिंग प्रोजेक्ट मॅनेजमेंट पूर्ण केले.
सध्या मेलबर्न स्थित डाल्टन कन्सल्टिंग इंजिनीअर्स मध्ये डिझाईन इंजिनिअर म्हणून शहराच्या मोठ्या पाणीपुरवठा योजनेच्या नियोजनाची जबाबदारी सांभाळत आहे. तिच्या निवडीबद्दल राज्याचे विधी सचिव विलास गायकवाड, कमोडर बालासुब्रमण्यम, उन्मेष गायधनी, सुजय माने, श्रीकांत पाटील आदींनी अभिनंदन केले. महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांची ती भाची आहे.