WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

“छत्रपती”नावासाठी कोल्हापुरात निघणार मोठा मोर्चा

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

_‘छत्रपती शिवाजी महाराज’ या पूर्ण नावाचे पुरोगाम्यांना वावडे का ? मोर्चासाठीभाग्यनगर येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांची प्रमुख उपस्थिती_

*‘शिवाजी विद्यापीठा’च्या नामविस्तारासाठी हिंदूच्या संघटित शक्तीचा अविष्कार : 17 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाद्वारे धडकणार !*

*कोल्हापूर* – कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठ’, या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपूर्ण उल्लेख असल्याने विद्यापीठाचे नाव अधिक सन्माननीय आणि पूर्ण स्वरूपात ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असे करण्यात यावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, 17 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’ चे नामकरण ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ करण्यात आले, ‘औरंगाबाद’ चे केवळ ‘संभाजीनगर’ नाव न ठेवता ते ‘छत्रपती संभाजीनगर’, अशी नावे बदलण्यात आली आहेत. तर शिवाजी विद्यापीठाला ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे पूर्ण नाव देण्यास पुरोगाम्यांचे वावडे का ? यातूनच विद्यापीठाच्या नावाचे ‘लघुरूप’ होईल, अशी ‘कथानके’, पसरवली जात आहेत. याउलट या नामविस्तारासाठी समाजातील प्रत्येक स्तरातून व्यापक पाठिंबा मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनधी, आमदार, खासदार, मंत्री यांच्यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, गड-दुर्ग प्रेमी, संघटना, संप्रदाय, तरुण मंडळे, शिवप्रेमी संघटना यांनी राज्यभरातून पाठिंबा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 200 हून अधिक ग्रामपंचायतींनी तशा आशयाचे ठराव केले आहेत. *17 मार्चला हा मोर्चा दुपारी 3 वाजता दसरा चौक येथून प्रारंभ होईल. यानंतर तो लक्ष्मीपुरी, व्हिनस कॉर्नर,   जिल्हाधिकारी कार्यालय येथे त्याची समाप्ती होईल. तेथे मान्यवरांची भाषणे होतील.* तरी या मोर्चासाठी राष्ट्रप्रेमी नागरिक, शिवप्रेमी यांच्यासह समाजातील प्रत्येक घटकाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक  सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत केले.

या पत्रकार परिषदेसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहसंयोजक  अभिजित पाटील, ‘छत्रपती ग्रुप’चे संस्थापक  प्रमोद पाटील, हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष  गजानन तोडकर, वीर शिवा काशीद यांचे वंशज  आनंदराव काशीद, हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष  राजू तोरस्कर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख  राजू यादव, स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे  अरुण गवळी, श्री स्वामी समर्थ महालक्ष्मी मंदिराचे  संजय हसबे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख  उदय भोसले, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे  शिवानंद स्वामी उपस्थित होते.

  •  अभिजित पाटील म्हणाले, ‘‘या मोर्चासाठी तेलंगणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह, तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.’’

आनंदराव काशीद म्हणाले, ‘‘या मोर्चासाठी विविध गडदुर्ग प्रेमी, संघटना, मर्दानी खेळाशी संबंधित मंडळे, कार्यकर्ते, इतिहास संशोधक-अभ्यासक यांचा मोठा प्रतिसाद आहे. या मोर्चासाठी राज्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात असलेल्या मावळ्यांचे वंशज उपस्थित रहाणार आहेत.’’

हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष  गजानन तोडकर म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयनमहाराज भोसले आणि श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले यांनीही याला पाठिंबा दिला आहे.’’ या प्रसंगी ‘छत्रपती ग्रुप’चे श्री. प्रमोद पाटील म्हणाले, ‘‘या मोर्चासाठी व्यापक स्तरावर प्रचार होत असून समाजातील प्रत्येक स्तराचा पाठिंबा आहे. चेंबर ऑफ कॉमर्स, विविध संस्था, तरुण मंडळे यांसह विद्यार्थी यांनीही या मोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. आम्ही मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होत आहोत.’’

*

या मोर्चाला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ने पाठिंबा दिला असू या संदर्भात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष श्री. ललीत गांधी यांनी कळवले आहे की ‘‘विद्यापीठाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, अशाच पद्धतीनेच दिले गेले पाहिजे, अशी आमची सर्वांची आग्रही भूमिका आहे. त्यासाठी सर्वांनी 2 तास दुकाने बंद करून मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आम्ही या निमित्ताने करत आहोत.’’

या मोर्चाला ‘श्री’ संप्रदायाने पाठिंबा दिला असून  विजयकुमार पाटील यांनी कळवले आहे की, ‘‘सातारा, सांगली, कोल्हापूरसह बेळगाव येथून ‘श्री’ संप्रदायाचे भक्तगण सहस्रोंच्या संख्येने उपस्थित रहाणार आहेत.’’, तसेच या मोर्चाला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने पाठिंबा दिला असून कोल्हापूर जिल्हा कार्यवाह  सुरेश यादव यांनी या मोर्चासाठी धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार आहेत, असे कळवले आहे.

 या मोर्चासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सहभागी असलेल्या सरदार-मावळे यांचे वंशज उपस्थित रहाणार आहेत.

या मोर्चात अनेक पथके सहभागी होणार असून यात ढोल-ताशा पथक, मर्दानी खेळ, शिवकालीन युद्धपथक, वारकरी-टाळकरी यांचे पथक, विविध संप्रदायांचे भक्त, मावळ्यांची वेशभूषा यांसह पारंपरिक वेशभूषा, महिलांचे रणरागिणी पथक सहभागी होणार आहे.*‘शिवाजी विद्यापीठा’च्या नामविस्तारासाठी हिंदूच्या संघटित शक्तीचा अविष्कार : 17 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाद्वारे धडकणार !*

 

*कोल्हापूर* – कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठ’, या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपूर्ण उल्लेख असल्याने विद्यापीठाचे नाव अधिक सन्माननीय आणि पूर्ण स्वरूपात ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असे करण्यात यावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, 17 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’ चे नामकरण ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ करण्यात आले, ‘औरंगाबाद’ चे केवळ ‘संभाजीनगर’ नाव न ठेवता ते ‘छत्रपती संभाजीनगर’, अशी नावे बदलण्यात आली आहेत. तर शिवाजी विद्यापीठाला ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे पूर्ण नाव देण्यास पुरोगाम्यांचे वावडे का ? यातूनच विद्यापीठाच्या नावाचे ‘लघुरूप’ होईल, अशी ‘कथानके’, पसरवली जात आहेत. याउलट या नामविस्तारासाठी समाजातील प्रत्येक स्तरातून व्यापक पाठिंबा मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनधी, आमदार, खासदार, मंत्री यांच्यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, गड-दुर्ग प्रेमी, संघटना, संप्रदाय, तरुण मंडळे, शिवप्रेमी संघटना यांनी राज्यभरातून पाठिंबा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 200 हून अधिक ग्रामपंचायतींनी तशा आशयाचे ठराव केले आहेत. *17 मार्चला हा मोर्चा दुपारी 3 वाजता दसरा चौक येथून प्रारंभ होईल. यानंतर तो लक्ष्मीपुरी, व्हिनस कॉर्नर,   जिल्हाधिकारी कार्यालय येथे त्याची समाप्ती होईल. तेथे मान्यवरांची भाषणे होतील.* तरी या मोर्चासाठी राष्ट्रप्रेमी नागरिक, शिवप्रेमी यांच्यासह समाजातील प्रत्येक घटकाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक  सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत केले.

 

या पत्रकार परिषदेसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहसंयोजक  अभिजित पाटील, ‘छत्रपती ग्रुप’चे संस्थापक  प्रमोद पाटील, हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, वीर शिवा काशीद यांचे वंशज  आनंदराव काशीद, हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष  राजू तोरस्कर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख  राजू यादव, स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे  अरुण गवळी, श्री स्वामी समर्थ महालक्ष्मी मंदिराचे  संजय हसबे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख  उदय भोसले, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे  शिवानंद स्वामी उपस्थित होते.

 

 अभिजित पाटील म्हणाले, ‘‘या मोर्चासाठी तेलंगणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह, तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.’’

 

 आनंदराव काशीद म्हणाले, ‘‘या मोर्चासाठी विविध गडदुर्ग प्रेमी, संघटना, मर्दानी खेळाशी संबंधित मंडळे, कार्यकर्ते, इतिहास संशोधक-अभ्यासक यांचा मोठा प्रतिसाद आहे. या मोर्चासाठी राज्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात असलेल्या मावळ्यांचे वंशज उपस्थित रहाणार आहेत.’’

 

हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष  गजानन तोडकर म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयनमहाराज भोसले आणि श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले यांनीही याला पाठिंबा दिला आहे.’’ या प्रसंगी ‘छत्रपती ग्रुप’चे श्री. प्रमोद पाटील म्हणाले, ‘‘या मोर्चासाठी व्यापक स्तरावर प्रचार होत असून समाजातील प्रत्येक स्तराचा पाठिंबा आहे. चेंबर ऑफ कॉमर्स, विविध संस्था, तरुण मंडळे यांसह विद्यार्थी यांनीही या मोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. आम्ही मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होत आहोत.’’

 

या मोर्चाला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ने पाठिंबा दिला असू या संदर्भात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष श्री. ललीत गांधी यांनी कळवले आहे की ‘‘विद्यापीठाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, अशाच पद्धतीनेच दिले गेले पाहिजे, अशी आमची सर्वांची आग्रही भूमिका आहे. त्यासाठी सर्वांनी 2 तास दुकाने बंद करून मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आम्ही या निमित्ताने करत आहोत.’’

 

 

या मोर्चाला ‘श्री’ संप्रदायाने पाठिंबा दिला असून  विजयकुमार पाटील यांनी कळवले आहे की, ‘‘सातारा, सांगली, कोल्हापूरसह बेळगाव येथून ‘श्री’ संप्रदायाचे भक्तगण सहस्रोंच्या संख्येने उपस्थित रहाणार आहेत.’’, तसेच या मोर्चाला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने पाठिंबा दिला असून कोल्हापूर जिल्हा कार्यवाह  सुरेश यादव यांनी या मोर्चासाठी धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार आहेत, असे कळवले आहे.

 या मोर्चासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सहभागी असलेल्या सरदार-मावळे यांचे वंशज उपस्थित रहाणार आहेत.

या मोर्चात अनेक पथके सहभागी होणार असून यात ढोल-ताशा पथक, मर्दानी खेळ, शिवकालीन युद्धपथक, वारकरी-टाळकरी यांचे पथक, विविध संप्रदायांचे भक्त, मावळ्यांची वेशभूषा यांसह पारंपरिक वेशभूषा, महिलांचे रणरागिणी पथक सहभागी होणार आहे.

VIDEO बघा 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.