धर्मांधांकडून ‘टीपू सुलतान आणि औरंगजेब’ यांच्या समर्थनार्थ स्टेटस् : संतप्त हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांची पोलीस ठाण्यासमोर निदर्शने…
कोल्हापूर – दिनांकानुसार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेकदिनाच्या दिवशीच सदरबझार येथील काही धर्मांधांनी ‘टीपू सुलतान आणि औरंगजेब’ यांच्या समर्थनार्थ भ्रमणभाषवर ‘स्टेटस्’ ठेवल्याचे काही हिंदुत्वनिष्ठांच्या लक्षात आले. यानंतर संबंधितांवर गुन्हा नोंद करून त्यांना अटक करावी, या मागणीसाठी संतप्त हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली. अशा प्रकारे जाणीवपूर्वक तेढ निर्माण करणार्या धर्मांधांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात देण्यात आले. धर्मांधांकडून मुस्लीम शासकांचे उदात्तीकरण केले जात असल्याच्या निषेधार्थ आणि कोल्हापूर जिल्ह्यात अशा घटनांचे वाढते प्रमाण पहाता हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी बुधवार, ७ जूनला कोल्हापूर बंदची हाक दिली आहे.
प्रथम दुपारी काही हिंदुत्वनिष्ठ तरुण लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गेले आणि धर्मांधांवर कारवाई करण्याची मागणी केली; मात्र पोलिसांनी संबंधिताचा भ्रमणभाष पडताळला पाहिजे, तसेच अन्य कारणे देत प्रारंभी गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केली असा आरोप हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केला. पोलिसांकडून प्रारंभी काहीच कारवाई होत नसल्याचे आणि धर्मांधांकडून ‘स्टेटस’ ठेवल्याचे वृत्त शहरात वेगाने परिसले. यानंतर मोठ्या संख्येने जमाव एकत्र आला आणि संतप्त झालेल्या जमावाने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही गल्ल्यांमध्ये काही दुकाने बंद करण्यास भाग पाडले.
या वेळी हिंदू समाज मोठ्या प्रमाणात एकत्र आल्याने प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रसंगी पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचे समजते. गेल्या काही मासांपासून जिल्ह्यात धर्मांधांकडून वारंवार सामाजिक संकेतस्थळावर राष्ट्रपुरुषांचा अवमान होत होता, ‘लव्ह जिहाद’च्या घटना घडत होत्या; मात्र पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित अशी कारवाई होत नव्हती. त्यामुळे धर्मांधांच्या वाढत्या मुजोरीमुळे अखेर हिंदू समाजाकडून आज संतप्त प्रतिक्रिया उमटले. सायंकाळी दोघ धर्मांधांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे, असे समजते. सायंकाळी या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, तसेच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या परिसरात जमलेल्या हिंदू युवकांना पोलिसांनी हुसकावून लावले.