कोल्हापूर बंद मागे घेण्याचे पोलीस अधीक्षक यांचे आवाहन…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात आक्षेपार्य स्टेटस ठेवल्याप्रकरणी वाद निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांकडून उद्या बुधवारी कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी चौकात सर्व हिंदुत्ववादी संघटना जमणार आहेत मात्र हा बंद मागे घेण्याचे आवाहन कोल्हापूर पोलीस अधीक्षक यांनी केले आहे.
दोन अल्पवयीन मुलांनी आक्षेपार्य स्टेटस ठेवल्या प्रकरणी कोल्हापुरात सायंकाळपासून वातावरण तणावपूर्ण बनले होते. लक्ष्मीपुरी आणि टाऊन हॉल परिसरातील हातगाड्यांवर दगडफेक करण्यात आली होती. आक्षेपार्य स्टेटस ठेवणाऱ्यांवर आणि ज्यांनी जमाव जमवून दगडफेक केली त्यांच्यावरही गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे. उद्या दिलेली कोल्हापूर बंदची हाक मागे घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.