सोनी सबवरील पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत आपल्यावर हात उचलणाऱ्या अश्विनला दीप्ती माफ करेल का?
सोनी सबवरील पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत पुष्पा (करुणा पांडे) या एका विलक्षण महिलेची प्रेरणादायक कहाणी सांगितली आहे, जी आपला आशावादी स्वभाव आणि कधीही हार ना माणण्याची वृत्ती यांच्या बळावर जीवनातील सगळ्या अडचणींना धडाडीने तोंड देते. आपल्या मुलांचा दक्षतेने सांभाळ करत असतानाच ती स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी देखील प्रयत्नशील राहते. आपला अभ्यास असो किंवा आपल्या कुटुंबासाठी काम करणे असो ती अत्यंत नेटाने काम करत राहते. तिच्या मनातील आशा कधीच मावळत नाही आणि उज्ज्वल आणि समाधानी भविष्यासाठी ती प्रयत्न करणे सोडत नाही. अन्यायाविरुद्ध ती खंबीरपणे उभी राहते आणि न्याय होईल याची खातरजमा करते.
मालिकेतील आगामी कथानक पुष्पाचा मोठा मुलगा अश्विन (नवीन पंडिता) याच्याभोवती फिरणारे आहे. आपली पत्नी दीप्ती (गरिमा परिहार) हिचा वाढदिवस साजरा करणाऱ्या अश्विनच्या मनात विविध भावनांचा कल्लोळ माजला आहे. दीप्तीच्या परिवारासमोर त्याला न्यूनतेची भावना होते. तो दीप्तीला लागेल असे काही तरी बोलतो. आणि त्यानंतर तर रागाच्या भरात दीप्तीवर हात उचलतो, जे पाहून दीप्ती आणि पुष्पा दोघींना धक्का बसतो. दीप्तीवर हात उचलल्याबद्दल पुष्पा अश्विनवर संतापते आणि त्याला घरातून निघून जायला सांगते.
या चुकीबद्दल दीप्ती अश्विनला माफ करेल का?
दीप्तीची भूमिका करणारी अभिनेत्री गरिमा परिहार म्हणते, “दीप्तीने नेहमीच आपला पती आणि परिवार यांना साथ दिली आहे आणि कठीण प्रसंगात देखील निभावून नेले आहे. पण आता तिच्या स्वाभिमानावरच हल्ला झाला आहे. त्यामुळे तिने कडक भूमिका घेतली आहे. त्यात आपली सासू पुष्पा ही स्वतःच्या मुलाविरुद्ध सुनेच्या बाजूने खंबीरपणे उभी आहे ही मोठा दिलासा देणारी गोष्ट आहे.” बघत राहा पुष्पा इम्पॉसिबल अशाच आणखी काही ट्विस्ट्ससाठी, दर सोमवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता फक्त सोनी सबवर!