24 वा कारगिल विजय दिवस साजरा…
कोल्हापूर – जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात आज 24 वा कारगिल विजय दिवस जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल (निवृत्त) रविंद्र राव तसेच सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अशोक पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
दीपप्रज्वलनानंतर सर्वांनी शहीदांना आदरांजली वाहण्यात आली. कारगिल युध्दात शहीद झालेले शिपाई मच्छिंद्र देसाई, नायक सुधाकर नामदेव भाट, सेपर्स सूरज साताप्पा मस्कर, सुभेदार संताजी भोसले या शहीद जवानांच्या वीरपत्नींचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी, शहीद जवान वीरपत्नी, सैनिकी मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी व सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिपिक नंदकुमार चावरे यांनी केले.