विनायक जितकर
विजयी झलक ग्रुप संघास चषक देताना प्राचार्य अर्जुन आबिटकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, बाजीराव चव्हाण सोबत मान्यवर व विजेता संघ.
गारगोटी प्रतिनीधी – भुदरगड तालुक्यासह संपुर्ण कोल्हापूर जिल्ह्यात बहुचर्चीत असणाऱ्या गारगोटी प्रेमिअर लिगचा अंतिम सामना झलक ग्रुप, गारगोटी व शिवाजी तरुण मंडळ, गारगोटी यांच्यामध्ये झाला. यामध्ये झलक ग्रुपने शिवाजी तरुण मंडळ संघाला पराभूत करत सन 2023 च्या बहुमान पटकविला. या अंतिम सामन्याचे उदघाटन आमदार प्रकाश आबिटकर व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, समाजातील धार्मिक व सांस्कृतिक भेद दूर करण्याचे काम क्रीडा स्पर्धा करतात. खेळाने सांघिक भावना निर्माण होऊन एकोपा वृध्दींगत होतो. प्रत्येक खेळाडू जात, धर्म व पंथ बाजूला ठेऊन मैदानात खेळाडूवृत्तीने उतरत असतो. खेळ हा जीवनात अपयश पचविण्याची तर यश टिकविण्याचे गुण विकसीत करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन व पाठिंबा दिल्यास अनेक प्रतिभावान खेळाडू तयार होतील त्यासाठी अशा स्पर्धा वारंवार झाल्या पाहिजेत असे ते म्हणाले.
गारगोटी प्रेमिअर लिग स्पर्धेत 21 संघांनी प्रवेश घेतला, दररोज 4 सामने खेळविण्यात आले. यामध्ये प्रथम पारितोषिक 77 हजार 777 रुपये व चषक, द्वितीय 55 हजार 555 रुपये व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकास 11 हजार 111 रुपये व चषक देण्यात आले. तसेच मॅन ऑफ द सिरीज जगदीश सुतार, मॅन ऑफ द मॅच सलमान शेख व 2023 चा उत्कृष्ठ खेळाडूचा बहुमान संजय कांबळे, भटवाडी यांनी पटकविला.
यावेळी बिद्रीचे माजी व्हा.चेअरमन ए.वाय.पाटील, गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, कल्याणराव निकम, जिल्हा बँक संचालक अर्जुन आबिटकर, भाजपा संघटक नाथाजी पाटील, अशोकराव भांदीगरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, बाळासाहेब भोपळे, जीपीएल कमिटीचे चेअरमन बाजीराव चव्हाण, संजय मालंडकर, माजी उपसरपंच अरुण शिंदे, उपसरपंच सागर शिंदे, आकुर्डे सरपंच रविंद्र पारकर, अजित जाधव, युवासेना तालुकाप्रमुख विद्याधर परीट, दिपक देसाई, ग्रामपंचायत माजी सदस्य सर्जेराव मोरे, रणधिर शिंदे, मनोहर परीट, विजय सारंग, गजानन शिंदे, महेश पवार, सुरेश चव्हाण, दशरथ राऊत, चंद्रकांत गोरे, अजित चौगले, प्रताप चौगले, यांच्यासह प्रमुख मान्यवर, क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















































































