शासन निर्णयाचा जैन समाजाकडून जाहीर निषेध… शासनाने घेतलेला निर्णय मागे घ्यावा – पद्माकर कापसे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

शाकाहारी विद्यार्थ्यांना मांसाहारी बनविण्याचे महाराष्ट्र शासनाचे षडयंत्र…

कोल्हापूर – महाराष्ट्र सरकारने एक शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार शाळेतील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळांमधून उकडलेली अंडी, अंडा पुलाव, अंडा बिर्याणी, केळी इत्यादी दिले जाणार आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

मांसाहार करणारे विद्यार्थी असतील ते मित्र जेंव्हा शाळेमध्ये अंड्याचे अर्थातच मांसाहार पदार्थ खातील तेव्हा साहजिकच जैन धर्मीय आणि इतरही शाकाहारी विद्यार्थ्यांना सहवासाने ते मांसाहार पदार्थ खाण्याची इच्छा होईल. अल्पवयीन अज्ञानी मुला मुलींना त्या विद्यार्थ्यांना आपले मित्र खातात म्हणून तेही मांसाहार भक्षण करण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे नकळतपणे विद्यार्थी अंड्याचे मांसाहारी पदार्थ खातील. ही सवय संपूर्ण जैन घराघरातील शुद्ध शाहकारी वातावरण बिघडू शकतात.

शासनाने निर्णयामध्ये असेही सांगितले आहे की अंडी उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी ही योजना चालू केली आहे. परंतु शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विद्यार्थ्यांना मांसाहारी बनविणे कितपत योग्य आहे. ह्या शासन निर्णयामुळे जैन, लिंगायत ब्राह्मण, महानुभव पंथी व असे अनेक शाकाहारी जातीय विद्यार्थी मांसाहारी होतील त्या समाजातील परंपरागत शुद्ध सात्विक शाहकारी व्रत भ्रष्ट होतील. ही अत्यंत गंभीर चिंतनीय बाब आहे. या निर्णयामुळे शाहकारी समाजातील कुटुंबात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या शासकीय निर्णयाचा जैन समाज जाहीर निषेध करीत आहे.

मांसाहार पदार्थ खाण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. पण मांसाहार पदार्थ खाण्यासाठी जर सार्वजनिकरित्या शासनाकडून शालेय स्तरावर मान्यता देत असतील तर ते अत्यंत अन्यायकारक आणि जुलमी आहे. अल्पवयीन शाहकारी विद्यार्थ्यांना मांसाहार चा मारा करण्यासाठी जो निर्णय घेतलेला आहे. तो त्वरित मागे घ्यावा अन्यथा सर्वच शाहकारी धर्मीय जातीय लोकांचे जनआंदोलन उभारले जाईल याची सरकारने नोंद घ्यावी सरकारच्या या निर्णयाविरोधात तीव्र सामाजिक लढा देण्यासाठी सनदशीर मार्ग अवलंबविला जाईल असा इशारा जैन संस्था संघटनेचे जेष्ट सामाजिक कार्यकर्ते पद्माकर कापसे यांनी पत्रकारांद्वारे दिले आहे.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.