अपघातात एकजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी ,निपाणी देवगड राजमार्गावर गैबी येथे अपघात
राधानगरी- विजय बकरे
निपाणी देवगड राज्यमार्गावर राधानगरी तालुक्यातील गैबी इथं ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकजण जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. यामधील जखमींला रुग्णालयात दाखल केलं आहे. तरुण धबधबा पाहण्यासाठी आले होते. उशीर झाल्याने धबधबा न पाहताच परत चालले होते.
मिरज तालुक्यातील शिंदेवाडी येथील हरीचंद्र भास्कर रणदिवे वय 26 वर्षे हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला.बाळूमामा दर्शन घेऊन धबधबा पाहण्यासाठी आले होते. वेळ झाल्याने गैबी येथून परत चालले होते. यावेळी मागून येणाऱ्या ट्रकची धडक बसल्याने मागील एकजन उडून पडला तर रणदिवे याच्या डोक्यावरून ट्रकचे मागील चाक गेल्याने जागीच ठार झाला. तर दुसरा महेश विलास रणदिवे वय 28 याना गंभीर जखमी अवस्थेत कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.ट्रक कोकणातून चिरा घेऊन कागलला चालला होता.
संबंधित ट्रकचालक मद्यधुंद असल्याचं पोलिसांनी सांगितले.राज्यमार्गावर झालेल्या या अपघातानंतर सुमारे दोन तास मृतदेह हा रस्त्यावरच पडून होता. राधानगरी पोलिस घटनास्थळी वेळेवर दाखल झाले होते.परंतु मृतदेह नेण्यासाठी राधानगरी तालुक्यात शेववाहिका नसल्यामुळे मृतदेह रस्त्यावरच सुमारे दोन तास राहिल्याने ट्राफिक जामची मोठी समस्या निर्माण झाली होती.राधानगरी पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी दोन तास या पोलिसांची कसरत सुरू होती.अखेर बाहेरून शेववाहिका आल्यानंतर मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला.दुर्गम आणि डोंगराळ तालुक्यात एकतही शववाहिका नसल्याची खंत व्यक्त केली.