विश्व मराठी संमेलनामध्ये दर्जेदार मराठमोळ्या कार्यक्रमांचा समावेश – दीपक केसरकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

ग्रंथ दिंडी, ढोल ताशा, विद्यार्थ्यांचे लेझीम पथकांच्या सादरीकरणाद्वारे मराठमोळ्या वातावरणात सर्वांचे होणार स्वागत…

मुंबई – येत्या 27 ते 29 जानेवारी 2024 या कालावधीत ‘विश्व मराठी संमेलना’चे नवी मुंबईतील वाशी येथे आयोजन होणार असून या संमेलनात मराठमोळ्या दर्जेदार कार्यक्रमांची रेलचेल असेल, अशी माहिती मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मंत्री केसरकर यांनी आज विश्व मराठी संमेलनाच्या आयोजनाचा आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी मराठी भाषा विभागाचे उपसचिव हर्षवर्धन जाधव, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी राज्य मराठी विकास संस्थेला देण्यात आली आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

जानेवारी 2023 मधील विश्व मराठी संमेलनाला मराठी भाषकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद पाहून यावर्षी देखील विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. याबाबत प्राप्त अभिप्रायांचा विचार करून आणि विश्व संमेलनाचा हेतू विचारात घेता ‘मराठी भाषेची वैश्विक व्याप्ती’ ही या विश्व संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना निश्चित करण्यात आली आहे.

संमेलनाच्या आयोजनाचा आढावा घेताना मंत्री केसरकर म्हणाले की, विश्व मराठी संमेलनासाठी जगभरातून मराठी भाषक प्रतिसाद देत आहेत. त्यांच्यासमोर मराठी भाषेतील दर्जेदार कार्यक्रमांचे सादरीकरण व्हावे. ग्रंथ दिंडी, ढोल ताशा, विद्यार्थ्यांचे लेझीम पथकांच्या सादरीकरणाद्वारे मराठमोळ्या वातावरणात सर्वांचे स्वागत व्हावे. महाराष्ट्राची, मराठी भाषेची महती सांगणारी, मराठी माणसांना जोडून ठेवणारी गीते, बोलीभाषेतून कला सादर करणाऱ्या कलाकारांचे कार्यक्रम, कविता वाचन, अभिवाचन, महाराष्ट्राचा इतिहास, संत साहित्याचा इतिहास अशा विविध कार्यक्रमांद्वारे उद्घाटनाचा सोहळा आयोजित व्हावा.

संमेलनाच्या विविध सत्रांमध्ये मराठमोळा वस्त्र सोहळा, खाद्य संस्कृती, व्यवहारात मराठीचा वापर, मराठी उद्योजकांचा परिसंवाद, तरुणाईमध्ये मराठी भाषेचा प्रसार होण्यासाठी उपाययोजना, प्रसारमाध्यमांच्या मराठी संपादक/ वाहिनी प्रमुखांशी संवाद, पुस्तक निर्मितीचा प्रवास जाणून घेण्यासाठी लेखक ते प्रकाशक यांच्याशी संवाद, भावगीते, शास्त्रीय संगीत आदींवर आधारित कार्यक्रमांचा समावेश करावा, अशी सूचना मंत्री केसरकर यांनी केली.

मराठी भाषेच्या संवर्धनामध्ये योगदान दिलेल्या राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा सहभाग घेण्याचा प्रयत्न करावा. राज्याबरोबरच इतर राज्य आणि परदेशातून मराठी भाषक येणार आहेत. त्यांनाही सहभागी करून घेण्याची सूचना मंत्री केसरकर यांनी यावेळी केली.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.