के.डी.सी.सी बँकेच्या ठेवीवरील व्याजात भरघोस वाढ…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

साडेआठ टक्क्यांपर्यंत मिळणार ज्यादा व्याज दर… संचालक मंडळाचा महत्वाचा निर्णय…

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ठेवींवरील व्याजदरात भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या व्याजदराच्या वाढीनंतर ठेवीवरील कमाल व्याजदर साधारणतः साडेआठ टक्के होतो. एक जानेवारी २०२४ पासून येणाऱ्या ठेवींवर हा वाढीव व्याजदर मिळणार आहे. बँकेने चालू आर्थिक वर्षात नऊ हजार, ५०० कोटी रुपयांच्या ठेवींच्या पूर्तीचा संकल्प केलेला आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

याबाबत अधिक माहिती अशी, एक जानेवारीपासून येणा-या ठेवींवर ०.१० टक्के ते ०.२५ टक्के इतकी वाढ केलेली आहे. तसेच; १५ लाख ते रु. १०० कोटींच्या वरील बल्क ठेवीकरता एक ते दोन वर्ष कालावधीसाठी ०.१० टक्के ते ०.४५ टक्के इतकी वाढ केलेली आहे. साधारण एक वर्षाकरिता ८.३५ टक्के व व दोन वर्षाकरिता ८.५० टक्के इतका व्याजदर होणार आहे. याशिवाय; दाम दुप्पट, पुनर्गुंतवणूक, रीकरींग या विविध योजनांमधील ठेवींना त्या- त्या मुदतीप्रमाणे व्याजदर मिळणार आहे. तसेच; ज्येष्ठ नागरिकांनाही नियमित व्याजदरापेक्षा ० . ५ टक्के जादा व्याजदर मिळणार आहे.

बँकेचे अध्यक्ष, पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ म्हणाले, केडीसीसी बँक ठेवीदारांना ज्यादा व्याजदर देण्यामध्ये नेहमीच अग्रभागी असते. ठेवीदारांनी बँकेच्या विविध योजनांमध्ये ठेवी ठेवून ज्यादा व्याजदराचा लाभ घ्यावा. केडीसीसी बँकेचे बँकेचे अध्यक्ष, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे, आमदार पी. एन. पाटील, खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, प्रा. अर्जुन आबिटकर, विजयसिंह माने, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी, दिलीप लोखंडे, आय. बी. मुन्शी आदी संचालक व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शिंदे उपस्थित होते.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.