विनायक जितकर
हेल्मेट सक्ती विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक… प्रादेशिक परिवहन कार्यालयाला दिले निवेदन…
कोल्हापूर – कोल्हापूर म्हणजे प्रयोगशाळा नाही कोल्हापुरातील रस्ते चांगले करा आणि मगच भावना लक्षात घेऊन कोल्हापुरात सक्ती करा असं म्हणत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना धारेवर धरलं.
जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी ज्या काही आता चेक पोस्टवर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार सुरू आहे तो बंद करा अन्यथा तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्याचा इशारा दिला. तर शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी काही दुचाकी धारकांना विना हेल्मेट चे मेमो पाठवले जात आहेत हे थांबवा अन्यथा परिणामास सामोरे जावं लागेल असे सांगितलं. |
प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने कोल्हापुरात हेल्मेट सक्ती लागू करत असल्याचे पत्रक जाहीर करण्यात आलं यानंतर कोल्हापूरकरांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालीय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कोल्हापुरात रस्ते चांगले करा पार्किंगची व्यवस्था आणि वाहतुकीचे नियोजन करावे आणि मगच हेल्मेट सक्ती बाबत जनभावना लक्षात घेऊन निर्णय घ्यावा अशी मागणी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी कोल्हापूर ही प्रयोगशाळा नसून कोणताही प्रयोग कोल्हापूर वर करण्याचा प्रयत्न करत हेल्मेट सक्ती लागण्याचा हा डाव आहे. जर हेल्मेट सक्ती लागण्याचा प्रयत्न केल्यास हेल्मेट सह प्रादेशिक परिवहन कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी पवार यांनी दिला.
यावेळी रवी चौगुले, राजू जाधव, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश करवीर, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, युवासेना जिल्हाधिकारी मंजित माने, बाजीराव नाईक, महिला संघटक प्रीती क्षीरसागर, दिपाली शिंदे, दत्ताजी टिपुगडे, सुशील भांदिगरे, धनाजी दळवी यांच्यासह शिवसैनिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.