तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
कोल्हापूर : वारणा सहकारी बँकेने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय प्रगती साधली असून, बँकेच्या ९४८ कोटी रुपये ठेवी, तर एकूण कर्जे ५८४ कोटी रुपये झाली आहेत. बँकेने चालूवर्षी प्राधान्य क्षेत्रात कर्जपुरवठा केला असून, त्यांचे एकूण कर्जासमवेत प्रमाण ६८.५६ टक्के आहे. बँकेचा मिश्र व्यवसाय १,५३२ कोटी रुपये, तर सीडी रेशो ६२ टक्के इतका आहे. बँकेच्या सर्व शाखा नफ्यात असून, २०२२-२३ या आर्थिक वर्षात ढोबळ नफा १८.४७ कोटी रुपये इतका असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे यांनी दिली.
बँकेच्या सांपत्तीक स्थितीचे निकष समाधानकारक असल्याचे कोरे यांनी सांगितले. बँकेच्या एकूण ३९ शाखा व १ एक्स्टेंशन काऊंटर अशा एकूण ४० शाखा कार्यरत आहेत. बँकेने सातत्याने ऑडिट वर्ग ‘अ’ मिळविलेला आहे. सर्व शाखा संगणकीकृत व अद्ययावत असून, बँकिंग प्रणालीशी जोडलेल्या आहेत. सर्व ग्राहक व खातेदार यांच्या सोयीकरिता जास्तीत जास्त अद्ययावत अशा बँकिंग सुविधा देण्यात आलेल्या आहेत.
यामध्ये प्रामुख्याने रूपे डेबिट कार्ड, एटीएम, पॉस, ई-कॉमर्स व मोबाईल बँकिंग, आयएमपीएस त्याचबरोबर आरटीजीएस, एनईएफटीसारख्या फंडस् ट्रान्स्फर व एसएमएस, मिस कॉल अलर्ट या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. ग्राहकांकरिता यूपीआय सुविधा चालू वर्षात कार्यान्वित करण्यात आली आहे. बँकेचे डेटा सेंटर कोल्हापूर या इमारतीमध्ये आहे. अहमदनगर येथे डी. आर. साईट कार्यान्वित आहे.बँकेला मिळालेले यश त्याचे श्रेय हे मी बँकेच्या सर्व सभासद, हितचिंतक, ग्राहकांना देतो, असे कोरे यांनी यावेळी सांगितले.
बँकेच्या प्रगतीसाठी सर्व सभासदांनी भविष्यकाळातही असेच आपले मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. स्व. तात्यासाहेब कोरे यांनी दूरदृष्टी ठेवून स्थापन केलेल्या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांबरोबरच समाजातील सर्व स्तरांतील जनतेच्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे उद्गार त्यांनी काढले.यावेळी बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष विश्वेश कोरे, बँकेचे व्हा. चेअरमन उत्तम पाटील, इतर संचालक, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सार्दळ, जनरल मॅनेजर प्रकाश डोईजड, डेप्युटी जनरल मॅनेजर पी. टी. पाटील आदी उपस्थित होते.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.