अनिकेत बिराडे-कोल्हापूर
मला आता सन्मानाने पुन्हा काेण व केव्हा उभे करणार ?
मी आज अनेकांना दिशा देण्यासाठी या ठिकाणी उभा राहिलो आहे. गेले अनेक वर्ष मला पाहत मार्गस्थ होणारे लोक मी पाहिले. अनेक वाहन चालकांना माझ्यामुळे दिशा मिळाली. सुरक्षितता मिळाली. मी होतो म्हणूनच ते वेळेत थांबायचे आणि,जायचे. माझा पेहरावच असा आहे. लाल -पिवळा आणि हिरवा ;थांबा.पहा,आणि जा .आणि आपलं आयुष्य निर्भयपणे सुरक्षित जगा.हाच माझा संदेश देण्याचा उद्देश. म्हणूनच मी वाहतुकीचे नियम पाळणारा, तसेच एक संदेश देणारा तुमचा आधारस्तंभ म्हणून इथे दिशादर्शक नावानं उभा आहे मात्र, भल्या पहाटे मी कोसळलो. आडवा झालो कोणीतरी अज्ञात वाहनाने मला धडक दिली की मी पडलो, हे आता cctv मध्येच दिसेल, तेही असतील चालू तर. जाऊदे तो तपासाचा भाग. पण, मी दिशा देता देताच आडवा झालो ठीक. वेदना तर झाल्याच. दिशा देण्याचा एक आनंद वेगळाच असतो. माझ्यामुळे सुरक्षित जाणाऱ्या वाहनांना पाहून मलाही बरं वाटायच. पण आज भल्या पहाटे मी कोसळलो. आडवा झालो . त्यामुळे दिशा आज देऊ शकत नाही, मात्र दुसऱ्या बाजूने वाईट वाटते. माझे साथीदार दिमाखात उभे आहे.अज्ञात वाहनाने मला जोराची धडक दिली.

जाता येता अनेकांनी मला पाहिलं.फोटो काढले. व्हिडीओ केले. पण दुःख इतकच की बघणारे बघतच राहिले. काहीजण तर माझी हेटाळणी ही करत होते तर काही जण हमदर्दी दाखवत आहेत. मी कोसळलो तरी मला सावरायला कोणीच आलं नाही. कोल्हापूर नगरीत मी पडलो म्हणे आपली इथे आपत्कालीन व्यवस्था आहे. महापालिका देखील आहे .माझा वाहतूक शाखेचा विभागही आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था आहेत. तत्काळ मदत करणारे लोक कोल्हापूर शहरात आहेत पण मला दिशा देण्यासाठी तुम्हाला सुरक्षित मार्ग दाखवण्यासाठी जलदगतीने कोणी उभा करण्यासाठी का पुढं आलं नाही याचं मनोमन वाईट वाटतं. मदत कार्यासाठी महापालिका आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतूक शाखा आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकारी आहेत. दुर्दैवी घटना घडली, अपघात घडला इमारत कोसळली, विजेचा खांब कोसळला की धावाधाव करणारे लोक आहेत. मदत करणारी भावना या अनेकांची आहे. परंतु मला मात्र पुन्हा दिशा देण्यासाठी उभं करण्याचं धाडस कोणच दाखवत नाही. बारा तास उलटून गेले तरी मी असाच कोसळलोय. पाहूया किती वेळाने मला उभे केले जातेय।लवकर उभे करू शकत नसेल तर किमान बाजूला तरी मला ठेवावे, इतकीच अपेक्षा. तुमचाच दिशा देणारा मी एक वाहतूक शाखेचा दिशादर्शक आधारस्तंभ. मला वाटलं म्हणून मी माझं मनोगत व्यक्त केले.

![]() |
https://youtube.com/shorts/uMLKduG4UpI?feature=share