नामदेव शिंपी समाज युवक संघ, महाराष्ट्र यांच्या वतीने डॉ. सचिन पतंगे यांना पुरस्कार जाहीर…
कोल्हापूर – समाजातील आपल्या देशासाठी बलिदान देणारे हुतात्मा, स्वातंत्र्यसैनिक यांचे क्रांतिकार्याचे सतत स्मरण राहावे व युवकां मध्ये देशप्रेम वृद्धिंगत व्हावे व त्यानिमित्ताने समाजातील आपल्या क्षेत्रामध्ये चांगले कार्य करणाऱ्या यशस्वी समाज बांधवांचा सन्मान व्हावा व त्यांच्याही कार्याचा परिचय संपूर्ण समाजास व्हावा या दुहेरी उद्देशाने “हुतात्मा हिरवे गुरुजी समाजभूषण पुरस्कार” या पुरस्काराची सुरुवात झाली. नामदेव शिंपी समाज युवक संघाच्या माध्यमातून हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. हुतात्मा हिरवे गुरुजी यांचे संपूर्ण नाव हुतात्मा तुळशीराम बाळकृष्ण हिरवे गुरुजी. हिरवे गुरुजी हे १५ ऑगस्ट १९५५ रोजी आपल्या प्राणांची पर्वा न करता देशासाठी, गोवा मुक्ती संग्रामामध्ये वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी शहीद झाले होते. हुतात्मा हिरवे गुरुजी यांच्या नावे प्रदान केला जाणारा हा पुरस्कार सन २०२३ या वर्षी नामदेव शिंपी समाज युवक संघ, महाराष्ट्र तसेच हुतात्मा हिरवे गुरुजी पुरस्कार वितरण नियोजन समितीच्या वतीने डॉ. सचिन जी पतंगे यांना १५ ऑगस्ट २०२३ या दिवशी देण्यात येणार आहे असे अधिकृतपणे जाहीर करण्यात येत आहे.
आजपर्यंत हा पुरस्कार संप्रदायाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कार्य व परंपरा जोपासणारे संत नामदेव महाराज यांचे वंशज ह.भ.प.श्री निवृत्ती महाराज नामदास वारकरी तसेच प्रसिद्ध खगोलशास्त्र व वैज्ञानिक मा. प्रसन्नजी वायचळ, प्रसिद्ध शिल्पकार, चित्रकार मा. अशोकजी काळे तसेच प्रसिद्ध वास्तुशास्त्र, ज्योतिर्विद वास्तु विशारद मा. आनंदाजी पिंपळकर यांना गत वर्षी प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे. सुरुवातीपासून सदर पुरस्कार वितरण समारंभ प्रतिवर्षी हुतात्मा हिरवे गुरुजी स्मारक, भाजी मार्केट, पनवेल येथे प्रदान करण्यात येतो. मागील वर्षीपासून समाज बांधवांनी पनवेल व्यतिरिक्त इतरत्र ठिकाणी हा कार्यक्रम घ्यावा ही विनंती विचारात घेऊन दरवर्षी १५ ऑगस्टला पनवेल येथे हुतात्मा हिरवे गुरुजी स्मारकात पार पाडणारा हा पुरस्कर समारंभ या वेळेस पुणे जिल्ह्यात घेण्याचे नियोजित आहे. त्यानुसार यावर्षी पुरस्कार वितरण समितीच्या माध्यमातून डॉक्टर सचिन जी पतंगे* यांचे नाव चर्चेत आले होते. त्यानुसार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली व त्यांचे आलेले माहितीनुसार त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यास आनंद होत असल्याची बोलून दाखवले. या यावर्षी काही तांत्रिक अडचणीमुळे १५ ऑगस्ट ऐवजी त्यानंतर असेल. “हुतात्मा हिरवे गुरुजी समाजभूषण पुरस्कार*” या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी पुरस्कार प्राप्त सन्माननीय व्यक्तीचे नाव निश्चित झालेले जाहीर करण्यात आले असून लवकरच पुढील काळात त्यांना सन्मानपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पुणे शहरापासून सुदूर असलेल्या ग्रामीण भागात फुलगांव येथिल श्रुतिसागर आश्रमाचा गोरगरीबांना वैद्यकीय सेवा हा एक महत्त्वाचा कार्याचा भाग आहे. येथिल पंचक्रोशीत आजपासून २० वर्षांच्यापूर्वी वैद्यकीय सेवा ही अत्यंत निकडीची गरज होती. ग्रामीण भागात सेवा देण्यास कोणीही डॉक्टर त्यावेळी तयार होत नव्हते. परंतु आश्रमाची गोरगरीबांच्यासाठी चाललेली तळमळ पाहून डॉ. सचिन पतंगे यांनी कसलाही विचार न करता आपला सांगवी येथिल शहरी भागात सुसज्ज अवस्थेत उत्तम प्रकारे चालत असलेला दवाखाना बंद करून आश्रमाच्या या धर्मादाय कार्यात २००१ पासून स्वतःला झोकून दिले.
आजूबाजूच्या गावांच्यामधील परिस्थिति व गरिबी लक्षात घेऊन फिरत्या दवाखान्याची कल्पना देऊन त्यांनी ती प्रत्यक्षात उतरविली व गेली कित्येक वर्षे ते आपली सेवा देण्यासाठी फुलगांव, आपटी, वढ़, तुळापूर या व आसपासच्या वस्त्यांच्यामध्ये जात होते. कसलीही पर्वा न करता रुग्णापर्यंत आपली सेवा पोहचविणे हे ते स्वतःचे कर्तव्य समजतात. वेळप्रसंगी पेशंटच्या विनंतीवरून त्यांच्या घरी जाऊन सुद्धा आपली सेवा देत असतात. त्यामुळे ते येथिल पंचक्रोशीत सुपरिचित व प्रिय झालेले आहेत. ऐन कोरोनाच्या साथीच्या दिवसात सुद्धा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दवाखान्याद्वारे चालत असलेल्या वैद्यकीय सेवेमध्ये त्यांनी खंड पडू दिला नाही. एक चिंतनशील आणि श्रद्धावान व्यक्तिमत्व असलेले डॉ. सचिन पतंगे अत्यंत आपुलकीने आणि प्रेमाने प्रत्येक रोग्याला आपली सेवा देत असतात. अत्यंत अचूकपणे रोगाचे निदान करणे व रोग्याला योग्य मार्गदर्शन करणे, यामुळे आजही अनेक ठिकाणाहून लांबून लांबून पुणे आणि पुण्याच्या बाहेरून सुद्धा अनेक रुग्ण त्यांच्याकडे येत असतात.
आपल्या वैद्यकीय क्षेत्राशी ते अत्यंत प्रमाणिक आणि समर्पित आहेत. सुरुवातीच्या काळात मुंबईसारख्या शहरात शासकीय होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये त्यांनी आपली सेवा दिली आहे. वेळोवेळी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या क्लिनिकद्वारे आजूबाजूच्या गरीब वस्त्यांच्यामध्ये मोफत औषधे आणि चष्मेवाटप शिबिर, रक्ततपासणी, लसीकरण, स्त्रीरोग तपासणी अशा वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले जात असते. अशा या धर्मादाय दयानंद दवाखान्याचे ते प्रमुख डॉक्टर वैद्यकीय अधिकारी आहेत. आज श्रुतिसागर आश्रमातर्फे मोठ्या प्रमाणावर चालत असलेले वैद्यकीय सेवाभावी कार्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्टपणे चालत आहे.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.













































































