WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

नक्की वाचा!…” बाई ग बिचाऱ्या त्या पोराला चोर केलं बघ….आमीबी पहिलाच डाव मोठ्या पडद्यावर बघताव..

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

आँखाे देखा हाल… विशेष साैजन्य- मिलींद यादव- (चिल्लर पार्टी)

” आमीबी पहिलाच डाव मोठ्या पडद्यावर बघताव सिनेमा” असं म्हणून तोंडातील तंबाखूची पिचकारी लांब टाकत शिंदे 

विशेष साैजन्य मिलींद यादव– चिल्लर पार्टी संयाेजक

सडपातळ शरीरयष्टी, फिकट निळ्या रंगाचा शर्ट घातलेला. शर्टाच्या खिशात तंबाखू व चुण्याची डबी आणि सोबतीला ठोकळा मोबाईल. ( चुना तंबाखू आणि मोबाईल एकाच घरात नांदण्यामागचं शास्त्र काही मला समजलं .) गळ्यात दोन माळांच्या सोबतीला एक . कोकणी माणसं अंधश्रद्धाळू . हे खरं.
हसणे धनगर वाड्यावर सिनेमा दाखवायचे . रात्री गावातच राहायचं होतं. म्हणून दुपारच्या उन्हात कोल्हापूर . दहा दिवसापूर्वी डांबरी रस्ता वाडी पर्यंत झालेला. त्यामुळे निवांतपणाने गावात जाता आलं .

सिनेमा दाखवायचा म्हणून शिंदेंची मुलगी ‘कविता’ अंगण सारवत होती. काय ते प्रशस्त अंगण. खरंच शहरात एवढ्याशा घरात राहणारे . या अंगणाचा आणि त्या कुटुंबाचा हेवा वाटू लागला. हाताशी बराच वेळ . रात्री आठाला जेवण बिवण करून गावकरी पोरा बाळासकट सिनेमा पाहायला यायची होती. गावकरी म्हणजे किती ? रात्री जमली तेव्हा बघितलं .

अवघ्या वाडीची लोकसंख्या शंभराच्या आत.” इथे जवळ डॅम हाय. फोटो चांगले येतात . चला जावून येऊ या, ” आता तोंडातला सगळाच ऐवज दूर फेकत शिदे म्हणाले. चला तर तीनयेक किलोमीटरची रपेट मारत, आम्ही त्या डॅमवर पोहचलो . पाण्याची पातळी कमी झाल्याने, पाण्याखालचे झाडांचे बुंधे, निरनिराळे आकार धारण करून मस्तपैकी पोज घेऊन बसलेले. एक बुंधा तर ‘ प्रिडेटर ‘ सिनेमातील त्या राक्षसाच्या चेहऱ्यासारखाच आकार धारण करून बसला . दुसरा समुद्राच्या काठावर ऊन खात पडलेला सील कसा दिसतो ? तसा . अंधारून यायला लागल होतं. म्हटलं, “चला निघायला हवं. पडदा लावायचा आहे. नंतर अंधारात काहीच करता यायचं .” परतीला दहा एक मिनिटं चालून गेलो असेन.
” ते , तिथे गौर बघा .” डाव्या हाताला असलेल्या 400 मीटर अंतरावरील डोंगरावर गव्याचे एक कुटुंबाच्या कुटुंब चरत झाडीतून मोकळ्या जागेत आले होते .
शेवटी माणसंच आम्ही. शांतपणाने निसर्गाच्या या सुंदरतेचा, संपन्नतेचा अनुभव घ्यायला जनावरच व्हायला हवं. आमची चाहूल लागली आणि ते सगळं कुटुंब झाडीत गडप झालं .

शिंदेंच्या त्या छान सारवलेल्या अंगणात चार चिल्ली पिल्ली मस्तपैकी तयार होऊन येऊन बसलेली.थोड्या मोठ्या मुलांनी मदत केली आणि आमच्या या टुरिंग टॉकीजचा पडदा उभारला गेला . मशीन जोडले . पण जेवण करून गावकऱ्यांना यायला आठ वाजले. सर्वांबरोबर संवाद झाला . सिनेमा सुरू झाला . एक गंमत मला इथं अनुभवायला मिळाली . सिनेमाची भाषा राजस्थानी मिश्रित हिंदी असूनही, ती त्यांना समजत होती. कारण अधून मधून पोरांच्या मागे बसलेल्या आयाबाया सिनेमात घडणाऱ्या प्रसंगावर आपल्या प्रतिक्रिया देत .

” त्येची पुस्तक जाळली ग. “
” आता त्या पोराने काय करावे बाई ?”
” बघ कसं लगेच चहा करायला .”
” बाई ग बिचाऱ्या त्या पोराला चोर केलं बघ.

मला याचा एवढाच अर्थ कळाला की भाषेचा बाज राजस्थानी असला काय आणि ती भाषा डोक्यावरून गेली काय? सिनेमा हे असं एक माध्यम आहे. जे तुम्हाला त्या कथेचा अंतरात्मा दाखवते .सिनेमा सुरू असतानाच वाडीतील शाळेचे शिक्षक ज्यांनी हे सर्व घडवून आणले ते जवळ आले वकानात कुजबुजले. “जेवण तयार आहे. जेवून घेऊया. राजू मोरजकर हे त्यांचे नाव . हरहुन्नरी माणूस . सुखी माणसाचा सदरा या माणसांन अंगात घातलाय . याची मला पदोपदी खात्री पटत गेली . उंची थोडी कमी . गोल गोरा , सदोदित हसरा चेहरा . पोट बिघडलेले असल्याने मी फक्त चव घेण्यापुरताच आत गेलो . काय चव ? सगळ जेवण चुलीवरचं . कोंबडा असा शिजला होता . काय सांगू ? पण त्याचा आस्वाद घेण्याची परवानगी पोट काही .

 

सह्याद्रीच्या डोंगररांगात वसलेली ही वाडी अठरा घरातील मंडळी सिनेमा पाहण्यात दंग असताना, माझे लक्ष सहज वर आभाळाकडे . तर आमचा हा सिनेमा पाहायला चांदोमामानेही हजेरी लावलेली . त्याचाच प्रकाश सगळ्या धरणीवर पसरलेला आणि छाया प्रकाशाच्या खेळात झाड आणि डोंगरांनी वेगवेगळे आकार धारण केलेले . सिनेमा संपला . मला वाटलं, चला आता बंद करू . तर पुढे बसलेली पोरं आणि एक माय ,” अजून एक दाखवा की .” म्हणजे मोठ्या पडद्यावर सिनेमा पाहण्याचं किती अप्रूप . मी म्हटले,” अरे उद्या लवकर उठायचं नाही ?”

” ती उठत्यात . तुम्ही काळजी करू नका . पोरं कुठली ढोरं हाईती .” बऱ्यापैकी वय , मागे खुर्चीत बसलेले एका आजोबांच्या तोंडून हे वाक्य बाहेर पडले आणि माझ्या हाताने आपोआपच केव्हा दुसरा सिनेमा सुरू केला हे कळलच नाही. दुसराही सिनेमा संपला आम्ही शाळेत झोपायला गेलो. खरं सांगू अशा पद्धतीने साऱ्या वाडीलाच एकत्र घेऊन सिनेमा दाखवायचा. हे एक माझं स्वप्न होतं ते आज पूर्ण झालं .

डोळ्यावर झापड होती पण रात्रभर नीट असा डोळा लागलाच नाही . मोठ्या पडद्यावर सिनेमा पहिल्यांदाच बघितलेले ते आनंदी चेहरे सारखे समोर येत होते .
पोर खुश …
पालक खुश …
आपुनबी खुश …

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.