पोलीस रमले मुलांच्यात कसे ते बघा
कोल्हापूर: खरतर, ती शाळेतील मुलं, विद्यार्थी दुरून पोलिसांना बघितलेलं. आदर राखणारी. पोलीस हत्यार पासून चारहात लांब राहणारी. परंतु, इथं मात्र पोलिसांच्यात मिसळून त्यांच्याजवळ, अवतीभोवती फिरणारी, त्यांची हत्यार हाताळताना विद्यार्थी वर्ग दिसला. कायदा म्हणजे काय, सुरक्षा व्यवस्था म्हणजे काय हे ऐकत होती.यातून भविष्यात आपणाला काय घडायचे आहे, पोलिसांचे कर्तव्य काय?नि पोलीस आपल्यासाठी काय करतात, कसे धाडस करतात. हेच सर्व काही जवळून जाणून घ्यायची इच्छा या मुलांना होती, तसेच पोलीस कर्मचारी, अधिकारी देखील मन लावून या साऱ्या विद्यार्थ्यांना माहिती देत होते. निमित्त होते,पोलीस दलाच्या वर्धापन दिनाचे. या विशेष उपक्रमात अनेक शाळांना सहभागी करून घेत पोलीस कर्मचारी विद्यार्थ्यांना आपलेसे पोलीस मित्र करत होते.
सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थ्यांना पोलीस दलाबाबत माहिती होऊन त्यांच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी या अनुषंगाने विविध उपक्रम घेत आहेत. त्यातीलच एक भाग म्हणून पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशान्वये पोलीस दलाच्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने सप्ताह सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांना पोलीस दलाबाबत माहिती व्हावी. त्यांच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना वाढावी.
या अनुषंगाने विविध उपक्रम घेण्याबाबत वरिष्ठांच्या सूचना आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील शाहूपुरी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संतोष डोके, यांच्या मार्गदर्शनाखाली येथील देशमुख हायस्कूल मधील इयत्ता आठवी व नववी मध्ये शिकणाऱ्या मुला मुलींना आज नवनवीन माहिती प्राप्त होत होती. पोलिसबाबाब उत्सुकता वाढली होती.पोलीस म्हणजे काय? त्यांचे कर्तव्य, नियम, अटी, कायदा सुव्यवस्था या सर्व घडामोडी कशा चालतात, याची सविस्तर माहिती शाहुपुरी पोलीस ठाणेतुन मिळाली.
मुलं, मुली यांचे कायदे, त्यानी कस वागावे, पोलिसांची कार्य प्रणाली काय आहे. महिलांच्या , मुलींच्या तक्रारीबाबत कसे काम करते…नागरिकांना अडचणी आल्यावर त्यांनी काय करावे….याची तसेच पोलीस दलामध्ये असणाऱ्या शस्त्राची,क्राइम ,बारनिशी, समन्स वॉरंट डिटेक्शन ब्रांच, सी.सी.टी.एन.एस , वायरलेस,ठाणे अमलदार, गोपनीय विभाग यांची तसेच लहान मुलांचे बाबतचे वाहतुकीचे नियम, सायबर क्राईम,सायबर फ्रॉड, पोकसो कायदा ,याबाबत पोलिस अंमलदार चेतन घाटगे यानी माहिती दिली..
यावेळी पोलीस उपनिरीक्षक रजपूत, सहा. फौजदार शंकर कोळी, पोलिस हवलदार नितीन सावंत, पोलीस आमलदार जलराज देसाई, ऋतुजा सावंत ,मनीषा मोगल, यांच्यासह देशमुख हायस्कूलचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
![]() |
![]() |