दशरथ खुटाळे/ शाहूवाडी-कोल्हापूर
प्रत्येक क्षेत्रात महिलांनी घेतलेली यशस्वी झेप आजपर्यंत कायम राहिल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूर एसटी विभागातील मलकापूर आगारात देखील सरोज महिपती हांडे यांनी पहिली महिला चालक होण्याचा बहुमान मिळविला आहे. शाहूवाडी तालुक्यातील सुपात्रे येथील सरोज महिपती हांडे यांनी रविवारी मलकापूर कोल्हापूर या मार्गावर पहिल्या महिला चालकाची जबाबदारी पार पाडली असून त्यांनी आपले कर्तव्य बजावले आहे.
यावेळी स्वागत करताना आगार व्यवस्थापक श्री. प्रमोद तेलवेकर, वाहतूक निरीक्षक श्री. सारंग जाधव, सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री.दिपक घारगे,वाहतूक नियंत्रक श्री. मनोज निगवेकर, दिपक सनगरे,इफरण सांगावकर, उदय गवळी, उत्तम पाटील, प्रशिक्षणार्थी वाहतूक निरीक्षक संदीप चव्हाण व इतर.
सरोज महिपती हांडे आज डेपोमध्ये हजर झाले त्यावेळी साहेबांनी मलकापूर कोल्हापूर अशा दोन फेरी मारण्यासाठी सांगितले. पहिल्यांदा स्टेरिंग वर बसताना मनात धाकधूक वाटत होती मात्र अधिकाऱ्यांचे पाठबळ आणि त्यांनी दिलेली साथ यामुळे डेपो मधून बाहेर पडल्यानंतर मनात कसलीही भीती राहिली नाही. मला वाघमारे साहेब हांडे साहेब व अनंत चिले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच माझी आई वैजयंता महिपती हांडे यांनी मला प्रोत्साहन दिले त्यामुळे मी आज एक यशस्वी झाले. |
खचाखच भरलेली एसटी चालवताना पुरुष चालकांना मोठी कसरत करावी लागते. त्यात महिला चालक असेल तर तिची अवस्था विचारायलाच नको. मात्र, याला छेद देत एसटीच्या कोल्हापूर विभागात सुपात्रे (ता. शाहूवाडी) येथील सरोज हांडे यांनी स्टेअरिंग हाती घेतले आहे.
मुळच्या शाहूवाडी तालुक्यातील सुपात्रे गावच्या असलेल्या महिलेची तालुक्यात एसटीची चालक म्हणून झालेली नेमणूक ही सर्वांना सुखद धक्का देणारी आहे. कोल्हापूर विभागात प्रथमच मलकापूर आगाराला महिला चालक म्हणून सरोज हांडे यांचे नेमणूक झाली आहे.या पदाकरिता ३० हून अधिक अर्ज महामंडळाकडे आले होते. सरोज हांडे यांचा अर्ज चारचाकी व अवजड वाहन चालविण्याचा परवाना असल्याने त्यांना हा बहुमान मिळविता आला. मात्र आता चक्क एसटीची चालक म्हणून एक महिलाच असल्याने सर्वांनाच एक सुखद धक्का मिळाला आहे.