…नविद मुश्रीफ यांच्या निवडीनंतर काय घडलं!!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या, कोल्हापूर (गोकुळ) – नविद मुश्रीफ यांची एकमताने निवड
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या (गोकुळ) च्या चेअरमनपदी नविद हसन मुश्रीफ यांची एकमताने निवड झाली आहे. ही निवड निवडणूक अधिकारी राजकुमार पाटील (विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. चेअरमन निवड प्रक्रियेत सुचक म्हणून विश्वास नारायण पाटील व अनुमोदक म्हणून अरुण गणपतराव डोंगळे यांनी मोलाचा सहभाग दिला.
गोकुळमध्ये नविद मुश्रीफ यांनी नेतृत्वाची जबाबदारी स्विकारल्याने संघाच्या कारभाराला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांनी संघाच्या विकासासाठी आधीपासूनच सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली गोकुळची वाढती प्रतिष्ठा, शेतकऱ्यांसाठी सुरु केलेले विविध उपक्रम, उत्पादनाचा दर्जा उंचावण्यासाठी घेतलेले निर्णय, यामुळे संघाचे कामकाज पारदर्शक आणि लोकाभिमुख राहिले आहे. नविद मुश्रीफ यांनी आपल्या कामगिरीने ‘गोकुळ’ला नवा विश्वास दिला आहे.
या निवडीच्या प्रसंगी माजी चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गोकुळच्या कारभारात नव्या युगाची सुरुवात!
नविद मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली ‘गोकुळ’ संघामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतकऱ्यांसाठी अधिक उपयुक्त योजना, गुणवत्तेच्या बाबतीत कठोर निकष, आणि उत्पादन प्रक्रियेतील पारदर्शकता या बाबींना अधिक बळकटी मिळणार आहे. त्यांच्या कार्यकुशलतेने कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी चळवळीला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
नविद मुश्रीफ काय म्हणाले
“गोकुळ संघाच्या कामकाजाचा विश्वास अधिक बळकट करणे आणि शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून आधुनिक तंत्रज्ञानासह काम करणे हा माझा मुख्य उद्देश आहे. गोकुळने गेल्या काही वर्षांत केलेली प्रगती ही सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि सदस्य शेतकऱ्यांच्या एकजुटीचा परिणाम आहे. या पुढच्या काळात आपण गुणवत्ता, पारदर्शकता आणि नवा दृष्टिकोन घेऊन गोकुळला अधिक उंचीवर नेऊ. गोकुळ हे केवळ दूध संघ नसून, शेतकऱ्यांसाठी आधारस्तंभ आहे, आणि मी सर्वांसोबत मिळून काम करण्यासाठी कटिबद्ध आहे.” – नाविद मुश्रीफ, चेअरमन, गोकुळ
निवडणूक प्रसंगी निवडणूक अधिकारी राजकुमार पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे, संचालक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित.
या निवडीमुळे श्री नवीद मुश्रीफ यांची गोकुळ दूध संघाच्या स्थापनेपासून सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून नोंद झाली. तसेच; आजपर्यंत अध्यक्ष झालेल्यांमध्ये पहिल्याच टर्ममध्ये अध्यक्षपदी निवड झाल्याचीही नोंद त्यांच्या नावावर झाली.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.