WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

‘गोकुळ’ दिनदर्शिका दुग्ध व्यवसायास माहितीपूर्ण – अरुण डोंगळे

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या, कोल्‍हापूर ‘गोकुळ’च्‍या २०२५ दिनदर्शिकेचे प्रकाशन…

कोल्‍हापूर – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत २०२५ या नवीन वर्षाच्या गोकुळच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते आणि संचालक मंडळ व अधिकारी यांच्या उपस्थितीत संघाच्या प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव येथे करण्यात आले. गेल्या चार वर्षांपासून या दिनदर्शिकेमध्ये गोकुळमार्फत दूध उत्पादकांच्या उत्कर्षासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची आधुनिक माहिती तसेच गोकुळ सौर ऊर्जा प्रकल्प, हर्बल पशुपूरक उत्पादने, मायक्रोट्रेनिंग सेंटर, गोचिड निर्मुलन आणि थायलेरीया लसीकरण, वासरू संगोपन, जातिवंत म्हैस विक्री केंद्र, बायोगॅस, वंध्यत्व निवारण शिबिरे, महालक्ष्मी मिनरल मिक्श्चर, कोहिनूर डायमंड, गोकुळ दुग्ध उत्पादने, तसेच दूध उत्पादकांना उत्तेजना देण्यासाठी चेअरमन आपल्या गोठ्यावर या सर्व विषयावर प्रबोधनात्मक माहिती या दिनदर्शिकेत देण्यात आली आहे.

यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळची दिनदर्शिका ही गोकुळचा दूध उत्पादक आणि संस्था यांच्या औत्सुक्याचा विषय असतो. दरवर्षी वेगवेगळे विषय घेऊन दूध उत्पादकांचे व दूध संस्थाचे प्रबोधन होण्यासाठी गोकुळ दूध संघामार्फत दरवर्षी दिनदर्शिका प्रसिद्ध केली जाते. ही दिनदर्शिका कमीत कमी कष्टात, कमी खर्चात किफायतशीर दुग्ध व्यवसाय करण्यासाठी अत्यंत माहितीपूर्ण ठरेल. यावर्षीच्या दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानावर मांडलेल्या विषयाची अधिक माहिती कायमस्वरूपी संग्रही ठेवायची झाल्यास प्रत्येक पानावरील क्यू.आर. कोड देण्यात आला आहे. हा कोड आपल्या स्मार्ट फोनने स्कॅन केल्यानंतर त्या विषयाचा लिखित तपशील आणि व्हिडीओ दूध उत्पादकास बघता येईल. या माहितीचा उपयोग नित्यनेमाने किंवा गरजेनुसार करणे दूध उत्पादकास सहज सोपे होणार आहे असे मनोगत व्यक्त केले. या दिनदर्शिका संघाशी संलग्न सर्व प्राथमिक दूध संस्थाना देण्यात येणार आहेत.

यावेळी चेअरमन यांनी संघाचे अधिकारी, कर्मचारी, दूध उत्‍पादक, दूध संस्था, वितरक व ग्राहक तसेच दूध वाहतूक ठेकेदार यांना नवीन वर्षाच्या गोकुळ परिवारातर्फे शुभेच्‍छा दिल्‍या.

यावेळी याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.