WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

गजलनवाझ पं. भीमराव पांचाळे यांच्या कारकीर्दीतील “गजलियत”

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

गजलनवाझ पं. भीमराव पांचाळे यांच्या कारकीर्दीतील सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी – उर्दू गजलांची भावगर्भ मैफिल “गजलियत” 

मुंबई – गजलनवाझ पं. भीमराव पांचाळे यांच्या गजल गायनाच्या कारकीर्दीतील, सुवर्णमहोत्सवी वर्षातील मराठी – उर्दू गजलांची भावगर्भ मैफिल शनिवार दि. २७ मे, २०२३ रोजी सायंकाळी ७.३० वाजता श्री. शिवाजी मंदिर, दादर येथे सादर होत आहे. या मैफिलीचे आयोजन झेन एंटरटेनमेंटच्या निर्माती – दिग्दर्शिका अश्विनी जालिंदर कांबळे यांनी श्री. छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट), मुंबई यांच्या सहयोगाने केले असून या मैफिलीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

गज़लनवाझ भीमराव पांचाळे यांच्या गझल गायनाच्या कारकिर्दीतील, सुवर्णमहोत्सवी वर्षातील गज़लमय मैफिलीला यादगार करण्यास त्यांची कन्या डॉ. भाग्यश्री पांचाळे यांची साथ लाभणार आहे. या मैफिलीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण भीमराव पांचाळे यांच्या गझल गायनाच्या कारकिर्दीतील रौप्यमहोत्सवी मैफिल जिथे रंगली होती, त्याच शिवाजी मंदिरात सुवर्ण महोत्सवी मैफिलीचे आयोजन ठरले असून ही गजलनवाझ भीमराव पांचाळे आणि डॉ. भाग्यश्री पांचाळे यांची हृदय मैफिल दादर मुंबईकरांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. या सुवर्णमहोत्सवी मैफिलीत गझलनवाझ पांचाळे हे ‘अंदाज आरशाचा’, ‘आयुष्य तेच आहे’, ‘तू नभातले तारे माळलेस का तेव्हा’, ‘मी किनारे सरकताना पाहिले’, ‘हा असा चंद्र’, ‘करते थोडी स्वप्ने गोळा’ अशा अनेक लोकप्रिय गझलांसह नव्या गझलाही सादर करतील. तसेच मुंबईकर रसिकांना आपली आवडती गझल ऐकण्याची फर्माईशही या कार्यक्रमात करता येणार आहे. या मैफिलीत गिरीश पाठक (तबला), सुधाकर अंबुसकर (हार्मोनियम), संदीप कपूर (गिटार), प्रशांत अग्निहोत्री (बासरी), अब्रार अहमद (संतूर), राशिद खान (व्हायोलिन) हे वादक कलाकार साथसंगत करणार आहेत. तर रवींद्र वाडकर हे या मैफिलीचे सूत्रसंचालन करणार आहेत. या कार्यक्रमाला समाजसेवक श्री विक्रांत आचरेकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

गझलनवाझ पंडित भीमराव पांचाळे यांची पहिली गझल मैफल सन १९७२ साली अकोल्यात आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी गेली ५० पन्नास वर्षे अथकपणे महाराष्ट्रासह देश-विदेशात गझल गायनाचे कार्यक्रम केले. इतक्यावरच न थांबता त्यांनी गझल सागर प्रतिष्ठानची स्थापना करून आतापर्यंत १० अखिल भारतीय गझल संमेलने आयोजित केली, अनेक गझल लेखन कार्यशाळा घेतल्या, वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केले, अनेकांना लिहिते-गाते केले, तसेच अनेक नवोदित गझलकारांच्या गझल संग्रहांचे प्रकाशन केले. आपल्या कार्याद्वारे त्यांनी आपल्या गझलगायनाला चळवळीचे स्वरूप दिले. बऱ्याच कालांतराने मुंबईत प्रथमच गझलनवाझ पांचाळे यांची मैफिल होत असल्याने गझलप्रेमी रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.