२५० लाभार्थ्यांना शिबिराचा लाभ… विविध योजनांचे लाभार्थ्यांना वाटप…
राधानगरी प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाच्या प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान अर्थात पीएम जनमन योजनेअंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा लाभार्थ्यांशी संवाद व विविध योजनांचे लाभार्थ्यांना वाटप असा संयुक्त कार्यक्रम पंचायत समिती राधानगरी व महसूल विभागाच्या वतीने ग्रामपंचायत सभागृहात पार पडला.
या कार्यक्रमात आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर, आधार कार्ड काढणे, आयुष्मान भारत कार्ड काढणे व गोल्डन कार्ड काढणे इत्यादी नागरी सुविधा मिळण्यासाठी कॅम्प घेण्यात आला. तसेच बँकेच्या वतीने विविध कर्ज योजनांची माहिती लाभार्थ्यांना देण्यात आली. २५० लाभार्थ्यांना शिबिराचा लाभ घेतला. यावेळी आदिवासी समाजाचे एकूण सोळा कुटुंबातील ६३ लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत ९, रेशन कार्डाचे ५, आधार कार्ड काढणे १० व आयुष्यमान भारत कार्ड १६ लाभार्थ्यांना संबंधित लाभाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राधानगरी भुदरगड तालुक्याचे आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील साहेब, उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे, तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख व गटविकास अधिकारी संदीप भंडारे तसेच विविध विभागाचे अधिकारी पदाधिकारी व ग्रामस्थ व इतर मान्यवर उपस्थित होते.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.














































































