कोल्हापूर – अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या लाडक्या गणरायाचं आज आगमन होतंय. केवळ गणेश मंडळ नव्हे तर घरोघरी गणरायाची भक्तीभावानं प्रतिष्ठापना करण्यात येतीय. त्यामुळंं सर्वत्र उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच सेलिब्रेटी आणि राजकीय नेत्यांच्या घरी लाडका बाप्पा विराजमान झाले आहेत. आमदार सतेज पाटील यांच्या निवासस्थानीही आज श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. पारंपारिक पद्धतीनं ढोल ताशांच्या गजरात आणि साधेपणानं आमदार सतेज पाटील यांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली. आज सकाळपासूनचं श्री गणेशाच्या आगमनाची सर्वत्र लगबग सुरु होती. आमदार सतेज पाटील यांच्या घरी मंगलमय वातावरणात बाप्पा विराजमान झाले. गणरायाचं घरी आगमन होताच, पाटील कुटुंबीयांनी मनोभावे पूजा केली. पारंपारिक पद्धतीनं आणि साधेपणानं आमदार सतेज पाटील यांच्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आलीय. गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर, आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी त्यांनी राज्यात सुख, शांती आणि समृद्धीसाठी गणरायाला साकडंही घातलं. आमदार सतेज पाटील यांनी मनोभावे प्रार्थना करत त्यांनी गणेशोत्सवानिमित्त जनतेला शुभेच्छाही दिल्या.
आमदार ऋतुराज पाटील यांनी देखील गणेशोत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत, दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व विघ्नंं गणराया दूर करू दे, असं साकडंही त्यांनी गणरायाला घातलं. यावेळी डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील, वैजंयती संजय पाटील, शांतादेवी डी पाटील, राजश्री काकडे, पूजा ऋतुराज पाटील, डी वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील, तेजस सतेज पाटील यांच्यासह पाटील कुटुंबियातील सदस्य उपस्थित होते. या बातम्या देखील जास्त वाचल्या गेल्या… लिंक ओपन करा.. वाचा ‘मिशन रोजगार’ साठी ‘क्रीडाई’ ने योगदान द्यावे – ऋतुराज पाटील ‘गांधीनगर’ योजनेमुळे पुढील ३० वर्षे मिळणार मुबलक पाणी – ऋतुराज पाटील आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिनी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन मारुतीराव जाधव गुरूजी यांचे कार्य आदर्शवत – आमदार प्रकाश आबिटकर गोकुळ दूध संघ हा कष्टकरी, श्रमजीवी शेतकऱ्यांचा आहे. – सतेज पाटील
|
आमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..
पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.
















































































