विनायक जितकर
आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवस नियोजन बैठकीत बोलताना आमदार जयंत आसगावकर
येत्या 12 एप्रिल रोजी होणाऱ्या आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिनी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सरचिटणीस गुलाबराब घोरपडे यांनी आमदार सतेज पाटील यांच्या कामाची व्याप्ती राज्यभर आहे. त्यामुळे त्यांच्या कामाची माहिती राज्यभरात पोहोचवूया अशी सूचना मांडली.
आमदार जयंत आसगावकर यांनी वह्यांचा स्वरूपात वाढदिवसाच्या शुभेच्छा हा अभिनव उपक्रम असून यावर्षी सुद्धा हा उपक्रम पुढे चालू ठेवूया असे सांगितले. यावेळी बोलताना शहराध्यक्ष सचिन चव्हाण म्हणाले की, आमदार सतेज पाटील यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात वेगवेगळे लोकोपयोगी कार्यक्रम घेतले जाणार आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ५१℅ सवलतीच्या दरात शेती अवजारे देण्यात येणार आहेत. तसेच शहरातही नवीन उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामध्ये सरकारी दवाखान्यासाठी औषधे, विद्यार्थ्यांना वह्या वाटप, खो खो स्पर्धा, राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा, फळ वाटप, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, , स्वयंम मतिमंद शाळेमध्ये जेवण व वस्तू वाटप, कुस्ती स्पर्धा, हॉस्पिटल, अनाथाश्रम व वृद्धाश्रमामध्ये औषधे, फळे वाटप, आरोग्य शिबिर, शैक्षणिक साहित्य वाटप, शिरोली ते कसबा बावडा उत्सव रॅली, अंधशाळेत जेवण, रुग्णांना ब्लॅंकेट वाटप, महिलांसाठी कॅन्सर मुक्त जनजागरण शिबिर,पाच हजार बांधकाम कामगार नोंदणी व साहित्य वाटप, कुष्ठरोगी लोकांना साहित्य वाटप, ग्रामदैवतांना अभिषेक, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, गरजू मुलांना स्कूल बॅग व गणवेश वाटप, सरकारी दवाखान्यातील डॉक्टर व कर्मचारी यांचा सत्कार, कॅरम स्पर्धा, मोफत नेत्र तपासणी शिबिर, महिला आरोग्य व रक्त तपासणी शिबिर, घरेलू कामगारांसाठी कार्ड वाटप, चित्रकला, हस्ताक्षर स्पर्धा असे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, शशिकांत पाटील चुयेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बजरंग पाटील, माजी आमदार गोपाळराव पाटील, युवराज गवळी, डॉ. महादेव नरके, विद्याधर गुरबे, भरत रसाळे, सरलाताई पाटील, उदय पोवार, वैभव तहसीलदार, विश्वास गुरव, मधुकर चव्हाण, संग्राम पाटील, मधुकर रामाने,संजय वाईकर, दीपक थोरात, प्रसाद देसाई, श्यामराव देसाई, शंकरराव पाटील, जयसिंग रेडेकर, भगवान जाधव, संध्या घोटणे, लीला धुमाळ, वैशाली महाडिक, उज्वला चौगुले, हेमलता माने, अंजली जाधव यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.