विनायक जितकर
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागातून येथील “हिलिंग गार्डन” साठी 2 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर
कागल : भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या पाठपुराव्यातून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागातून येथील “हिलिंग गार्डन”साठी 2 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल प्रजापिता ब्रह्माकुमारी च्या सदस्यांनी त्यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. येथील सामाजिक वनीकरणाच्या उत्तरेस पाच एकर जागा या हिलिंग गार्डनसाठी अधिग्रहण केली असून या जागेवर ही आरोग्यदायी संकल्पना साकारणार आहे. आत्मिक समाधान व आरोग्यमय दीर्घायुष्य हा या संकल्पनेचा उद्देश असून कागलकरांना या अनोख्या संकल्पनेचा पुरेपूर फायदा होणार आहे. यावेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी च्या राजश्री बहेनजी, कविता बहेनजी उपस्थित होत्या. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या प्रधान कार्यालयात भरवण्यात आलेल्या जनता दरबारमध्ये ब्रह्माकुमारीच्या सदस्यांनी भेट घेऊन येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या हुबेहूब प्रतिकृतीचे मंदिर भेट म्हणून देत राजे समरजीतसिंह घाटगे यांचे आभार मानले.
यावेळी बोलताना माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी म्हणाले या हिलिंग गार्डनमध्ये ध्यानधारणा केंद्र, विश्रांती केंद्र, उपासना केंद्र, प्रार्थना केंद्र, विविध प्रकारचे आरोग्यदायी सेमिनार यासह विविध उपक्रम राबविले जाणार असून मानवी आरोग्य संतुलित ठेवण्याच्या दृष्टीने ही संकल्पना फार महत्त्वाची आहे. राजे समरजितसिंह घाटगे यांनी या उपक्रमाला आर्थिक तरतूद उपलब्ध करून मानवी जीवन निरोगी व तंदुरुस्त करण्यासाठी त्यांचा हा निर्णय अत्यंत विधायक व कौतुकास्पद म्हणावा लागेल. यावेळी शाहू कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, संचालक सुनील मगदूम, डी. एस. पाटील, सतिश पाटील, राजे बँकेचे चेअरमन एम. पी. पाटील, संचालक राजेंद्र जाधव, वाय. टी. पाटील (चिखली) यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मानवी जीवन सुखकर करणारे ऊर्जा केंद्र –
या अनोख्या उपक्रमातून साक्षात ब्रम्हांडाची,ईश्वराची ताकद अनुभवता येणार आहे. अत्यंत धक्काधक्कीच्या सध्याच्या मानवी आयुष्याला अध्यात्माची गरज असून मानवी जीवन सुखकर करणारे हे एक ”पावरहाऊस” आहे. विश्वशांती हा या संकल्पनेचा मुख्य हेतू असून राजे समरजितसिंह घाटगे यांच्या दातृत्वातून समाजाला या संकल्पनेचा चांगला लाभ होणार असल्याचे यावेळी ब्रम्हाकुमारीच्या राजश्री बहेनजी यांनी सांगितले.
![]() |
![]() |