इचकलरंजी: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इचलकरंजी सतर्क राहिली पाहिजे, यासाठी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसंदर्भात असलेल्या उपकरणांची, ऑक्सिजन व आवश्यक बेडची पाहणी करीत संपूर्ण हॉस्पिटलचा आढावा घेतला.
कोरोनाचा धोका अजूनही संपलेला नाही, त्यामुळे कोरोना नियमांचं काटेकोर पालन करतानाच खबरदारीच्या उपाययोजनाही राबवाव्या लागतील, असे यावेळी आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी सांगितले.
याप्रसंगी अधिक्षक डॉ. दिलीप वाडकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सूर्यवंशी, डॉ. इम्रान तांबोळी, बाळासाहेब कलागते, कपिल शेटके यांच्यासह स्टाफ उपस्थित होता.